अजून साधारणपणे तीन दिवसांनी नवीन वर्षाची सुरुवात होत असून 2024 च्या स्वागतासाठी आता प्रत्येक जण उत्सुक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर या नवीन वर्षामध्ये अनेक शुभ आणि अशुभ असे योग तयार होत असल्याने त्या त्या पद्धतीने बारा राशींपैकी प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या पद्धतीचा चांगला किंवा वाईट परिणाम होणार आहे.
तसेच काही ग्रह त्यांची चाल बदलणार असल्यामुळे देखील काही राशींवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. याच बाबतीत जर आपण शनिदेवाचा विचार केला तर व्यक्तींना त्याचा कर्मानुसार फळ शनिदेव देत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनी स्वतःच्या कुंभ राशीत असून 2024 मध्ये देखील शनी कुंभ राशीतच असणार आहेत.
म्हणजेच 2024 मध्ये शनि राशी बदलत नसले तरी आपली चाल मात्र बदलणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शनी 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत कुंभ राशीमध्ये उलटी चाल चालणार आहेत. हीच उलटी चाल काही राशींच्या लोकांना खूप नुकसानकारक व त्रासदायक ठरणार आहे. नेमकी शनीची ही उलटी चाल कोणत्या राशींना नुकसानकारक ठरू शकते? त्याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.
शनीची उलटी चाल या राशींच्या लोकांना ठरेल नुकसानकारक
1- मकर– शनि देवाच्या उलट्या चालीमुळे मकर राशींच्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे मकर राशीचे व्यक्ती 2024 मध्ये शनीच्या साडेसाती खाली असतील.
या कालावधीत शनी उलटी चाल चालायला लागतील तेव्हा मकर राशींच्या व्यक्तींवर संकट कोसळू शकतात. त्यांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच काही अपघाताचे बळी देखील पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मकर राशींच्या व्यक्तींनी खूप काळजी घेण्याची गरज आहे.
2- कर्क– कर्क राशीच्या व्यक्तींना 2024 मध्ये शनीच्या उलट्या चालीमुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागेल.
आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. शनी कर्क राशीच्या लोकांच्या प्रत्येक कामात अडथळा आणू शकतात. व्यक्तींना 2024 मध्ये भाग्याची देखील साथ लाभणार नाही. कर्क राशीच्या व्यक्तींचे आर्थिक नुकसान देखील होण्याची शक्यता असल्यामुळे कोणतेही काम खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
3- कुंभ– 2024 मध्ये शनीच्या उलट्या चालीमुळे कुंभ राशींच्या व्यक्तींना खूप पैसा खर्च होऊ शकतो. जीवनामध्ये अनेक चढउतारांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
तसेच कुंभ राशीच्या व्यक्तींचे 2024 मध्ये अनेक खर्च नियंत्रणा बाहेर जातील. नोकरी आणि व्यवसाय मध्ये देखील अपयश येऊ शकते. त्यामुळे कुंभाराशींच्या व्यक्तींना 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 कालावधीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
( टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. यासंबंधी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत.)