पाथर्डी – मित्रासोबत त्याच्या बहिणीच्या लग्न पत्रिका वाटणाऱ्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे
लग्नपत्रिका वाटून परत गावाकडे येत असतांना माणिकदौंडीहून पाथर्डीकडे भरघाव वेगात जाणाऱ्या बोलेरो गाडीने धडक दिली.
तालुक्यातील केळवंडी फाट्यावर झालेल्या या अपघातात सुट्टीवर आलेला जवान दादासाहेब लक्ष्मण आठरे (रा.केळवंडी,ता.पाथर्डी)याचा अपघातात मृत्यू झाला तर त्याचा मित्र ऋषिकेश विक्रम शेटे हा जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भारतीय सैन्यात असणारे दादासाहेब लक्ष्मण आठरे(रा.केळवंडी)हे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते.
यावेळी त्यांचे मित्र ऋषिकेश शेटे यांच्या बहिणीच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गाडी न.एम.एच.१२,एल वाय-८५८७ या दुचाकीवर पाथर्डी येथे आले होते.
त्यानंतर पत्रिका वाटून परत गावाकडे जात असतांना केळवंडी फाट्यावर माणिकदौंडीहून पाथर्डी कडे जाणाऱ्या बोलेरो गाडीने आठरे यांच्या गाडीला जोराची धडक दिली.
या धडकेत दादासाहेब आठरे व ऋषिकेश शेटे या दोघांना जोराचा मार लागला.यावेळी उपस्थित नागरिकांनी दोघांनाही पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र दादासाहेब आठरे हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.तर जखमी ऋषिकेश शेटे याला पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी दवाखान्यात हलवले आहे.
याबाबत मयत दादासाहेब आठरे यांचे भाऊ नानासाहेब आठरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात एम.एच.१६,एटी-४०५७ या काळ्या रंगाच्या बोलेरो गाडी चालकाविरुद्ध फिर्याद दिली असून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !
- Solapur Pune Highway : सोलापूर ते पुणे महामार्ग होणार सहापदरी ! तीन उड्डाणपूल
- गुगलचा वापर करताना जरा सावधान! गुगलवर घ्याल ‘या’ गोष्टींचा शोध तर खावी लागेल तुरुंगाची हवा; जाणून घ्या माहिती
- FasTag Rules 2025 : फास्टॅग नियमांमध्ये झाले मोठे बदल ! वाहतूक कोंडी…
- नवीन सिमकार्ड घेण्यासाठी करावे लागणार आता ‘हे’ काम! पीएमओने दूरसंचार विभागाला जारी केल्या सूचना