Petrol Diesel Price : सर्वसामान्यांसाठी खुशखबर ! मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणार, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Petrol Diesel Price : येत्या चार दिवसात नवीन वर्षाला अर्थातच 2024 ला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच देशातील सर्वसामान्यांना एक मोठी भेट मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2024 वर्ष सुरू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांना महागाईतुन दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करणार आहेत. खरे तर गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे.

महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. हाती आलेला पैसा आता संसारातच खपू लागला आहे. यामुळे शासनाविरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठी नाराजी आहे. परिणामी निवडणुकांमध्ये मोदी सरकारला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका अर्थातच खासदारकीच्या निवडणुका होणार आहेत आणि अशातच सर्वसामान्यांची ही नाराजी आगामी निवडणुकांमध्ये मोदी सरकारला जबर नुकसान पोहोचवू शकते असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षाच्या आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास आठ ते दहा रुपयांनी कमी होणार असा अंदाज आहे. मात्र याबाबत अजूनही सरकारच्या माध्यमातून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, 2024 च्या पहिल्या सहामाहीत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास आठ रुपयांपर्यंत कमी होतील आणि याबाबतची घोषणा ही नवीन कॅलेंडर वर्ष सुरू होण्यापूर्वीच केली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून सविस्तर प्रस्ताव देखील तयार झाला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रस्तावात पेट्रोल आणि डिझेलचे दर आठ ते दहा रुपयांनी कमी केले पाहिजेत असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे या प्रस्तावाला आता पंतप्रधानांची मंजुरी मिळणे बाकी असून या प्रस्तावाला आज मध्यरात्रीपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्याने पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून हा प्रस्ताव पंतप्रधानांच्या पुढ्यात मंजुरीसाठी ठेवला गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe