अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आखून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने उपाययोजना करणे अपेक्षित होते. राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड
झाला असून या निष्क्रिय सरकारला जनतेला होणाऱ्या अगणित त्रासाची कसलीच जाणीव राहिलेली नाही, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी केली.
महाराष्ट्रातील शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याला सर्वस्वी सत्ताधारीच जबाबदार आहेत, असे निवेदन भाजपचे आमदार पाचपुते व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार महेंद्र माळी यांना देण्यात आले.
संपूर्ण देशात कोविडचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यूदर यात दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक एकवर पोहोचला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा,
राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या सर्व गोष्टींकडे होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्राची, जनतेची दयनिय अवस्था झाली आहे. राज्यामध्ये प्रशासन अस्तित्वात आहे,
अशा प्रकारची भावना लोकांमध्ये उरलेली नाही. किंबहुना राज्य करणारे जे सत्ताधारी आहेत, त्यांचं अस्तित्वच जाणवत नाही. राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं आहे, असे पाचपुते म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com