Bike Information:- भारतामध्ये अनेक प्रकारच्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार तसेच दुचाकी व इतर वाहनांची निर्मिती केली जाते.
भारतामध्ये निर्माण होणाऱ्या बाईकचा विचार केला तर अगदी सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमती पासून तर अडीच ते तीन लाखापर्यंत मिळणाऱ्या अनेक स्पोर्ट बाईक तयार केल्या जातात. या अनुषंगाने जर आपण 2023 या वर्षाचा विचार केला तर भारतामध्ये अनेक पावरफुल अशा बाइक्स लॉन्च करण्यात आल्या होत्या.
अनेक दिग्गज कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स बाजारात आणले. अनेक कंपन्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या बाईकच्या मॉडेलमध्ये जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये आणि दर्जा देण्याचा प्रयत्न केला व विदेशामध्ये देखील भारताच्या या प्रयत्नांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले.
भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्यांनी कमीत कमी किमतीमध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकतील अशा बाईक लॉन्च केल्या. भारतामध्ये 2023 या वर्षात लॉन्च झालेल्या काही महत्त्वाच्या अशा बाईक्स बद्दल माहिती घेणार आहोत.
भारतात तयार झालेल्या या बाईक्सने जगात केली धूम
1- हिरो करिझ्मा– हिरो मोटो कॉर्पने करिझ्मा XMAR या नावाने पूर्णपणे नवीन अवतारात सादर केली. या नवीन करिज्मा बाईकला फुल बॉडी फेअरिंग देण्यात आलेले असून डिझाईन देखील शार्प अशी देण्यात आलेली आहे. या बाईकमध्ये केलेले प्रीमियम डिटेलिंग खूपच आकर्षक असून त्यात पूर्णपणे नवीन इंजिन बसवण्यात आले आहे. या बाईकमध्ये 210cc, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे व ते 25.5 bhp पावर आणि 20.4 Nm टॉर्क जनरेट करते. करिज्मा XMAR ची किंमत एक लाख 80 हजार रुपये( एक्स शोरूम) इतकी ठेवण्यात आलेली आहे.
2- केटीएम 390 ड्यूक– नवीन केटीएम ड्युक 390 ही तिच्या आधीच्या मॉडेल प्रमाणेच अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज अशी बाईक असून तिची रचना आता आणखी आक्रमक आणि आकर्षक करण्यात आलेली आहे. या बाईकमध्ये 399 सीसीचे इंजिन देखील समाविष्ट करण्यात आलेले असून ते 45 bhp पावर आणि 39 Nm टॉर्क जनरेट करते. केटीएम 390 ड्यूक ही बाईक इतर बाईकपेक्षा सर्वात महाग असून तिची किंमत तीन लाख 11 हजार रुपये( एक्स शोरूम ) इतकी आहे.
3- टीव्हीएस अपाची RTR 310- या गाडीची आकर्षक शैली आणि अनोख्या वैशिष्ट्यांमुळे या गाडीने जगभरात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. या बाईकमध्ये ३१२.१२ सीसी लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजन असून ते 35 bhp पावर आणि 28.7 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची किंमत दोन लाख 43 हजार ते दोन लाख 64 हजार रुपये( एक्स शोरूम) दरम्यान आहे.
4- हार्ले डेविडसन X440- भारतीय बाजारपेठेमध्ये जवळजवळ विस्मरणात गेलेल्या हार्लेला या बाईक मुळे पुन्हा नवीन ओळख मिळाली असून ही कंपनीची भारतीय बाजारपेठेतील सर्वात परवडणारी बाईक आहे. ही बाईक हिरो मोटो कॉर्पच्या भागीदारीने बाजारपेठेत आणली गेली आहे. हार्ले डेविडसन X440 मध्ये 440cc लिक्विड कुल्ड, दोन व्हाल्व इंजिन देण्यात आले असून ते 27.37 bhp पावर आणि 38 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची किंमत दोन लाख 40 हजार रुपये( एक्स शोरूम) पासून सुरू होते.
5- Triumph Speed 400/ स्क्रॅम्ब्लर 400X- ब्रिटिश बाईक निर्माता Triumph ने बजाज ऑटो सोबत भागीदारी करून या दोन बाईक भारतीय ग्राहकांना 2023 मध्ये अतिशय कमीत कमी किमतीत सादर केल्या. या दोन्ही बाइक कंपनीच्या भारतातील सर्वात स्वस्त बाईक म्हणून लॉन्च करण्यात आल्या होत्या.
यामध्ये स्पीड 400 आणि स्क्रबलर 400 एक्स या बाईक्स त्यांच्या परफॉर्मन्समुळे आणि गुणवत्तेमुळे लोकांच्या पसंतीस उतरल्या. आकर्षक लुक असणाऱ्या या दोन्ही बाईक्समध्ये 398 सीसी सिंगल सिलेंडर इंजन देण्यात आले असून ते 8000 rpm वर 40 bhp पावर आणि 6500 rpm वर 37.5 Nm टॉर्क आउटपुट जनरेट करतात. यामध्ये स्पीड 400 ची किंमत 2 लाख 33 हजार रुपये( एक्स शोरूम) पासून सुरू होते.