कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द? जाणून घ्या सर्व स्तरावरील परीक्षांची माहिती

Published on -

सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता विविध क्षेत्रांनी आपल्या नियोजनात लवचिकता आणली आहे. तेच शिक्षण विभागाने केले. ज्या प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.

परंतु आता अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने या परीक्षाही रद्द कराव्यात, या परीक्षा घेणं शक्य नसल्याचं राज्याकडून UGC ला कळवण्यात आलं आहे.

विद्यापीठ अनुदान समितीने (UGC) अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुल लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

त्याच प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात, याविषयी UGC ला पत्र पाठविण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं.

राज्यातील 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा तसेच मानसिक स्वास्थ्याचा विचार करता अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मार्क्स ग्रेडेशन पद्धतीने देण्याविषयी युजीसीला लिहिलं आहे.

याविषयी ठोस निर्णय घेण्यासाठी पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्यसचीव अजोय महेता, शिक्षण सचिव विजय सौरव यांची बैठक घेण्यात येणार आहे.

कुलगुरूंशी चर्चा करून UGC च्या सूचनांप्रमाणे ग्रेडेशनची पद्धत स्वीकारून पुढे काय करायचं याविषयी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने येत्या दोन दिवसात ठोस निर्णय घेतला जाणार आहे.

मार्क्स ग्रेडेशन होणार या प्रकारे ग्रेडेशन करताना कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने हे मार्क्स ग्रेडेशन करण्यात येणार आहे.

युजीसीच्या मार्गदर्शनानुसारच हे ग्रेडेशन देण्यात यावे. याविषयी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

सीईटी होणार तालुकास्तरावर सीईटीच्या परीक्षांसाठीचे वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आले आहे. पण त्याविषयी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागले तर तसे निर्णयही भविष्यात घेतले जातील असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सध्या जुलैच्या 4 तारखेपासून 31 तारखेपर्यंत युजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

यामधून काही विद्यार्थ्यांची परीक्षा राहिल्यास पुन्हा 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्याक्रमाची प्रवेश प्रक्रियेस सुरुवात वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय व पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे किंवा इतर काही कारणांमुळे लिंक, वेबसाईटमध्ये काही अडथळे निर्माण झाले असतील तर त्या लिंक, वेबसाईटही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या उर्वरीत सीईटी परीक्षांच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News