शिर्डीमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्याला ताप ! एकनाथ शिंदेनंतर आता ‘हा’ बडा नेता बंड करणार

Published on -

Ahmednagar Politics News : आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी सध्या महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. राजकारणात क्षणोक्षणी मोठमोठ्या घडामोडी होत आहेत. विशेषतः अहमदनगरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उलथापालथ सुरु आहे.

खरे तर आता बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. यामुळे राज्यातील विविध पक्षांच्या माध्यमातून आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने साईनगरी शिर्डीत अहमदनगर काबीज करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे. खरेतर राष्ट्रवादीत उभी फूट पडण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्ष अहमदनगरमध्ये सर्वात बलाढ्य पक्ष होता.

पक्षाकडे फुटीपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात सहा आमदार होते. पण, जेव्हा पक्षात उभी फूट पडली तेव्हा अजितदादांकडे चार आमदार गेलेत. म्हणजे जिल्ह्यात आता शरद पवार गटाकडे फक्त दोनच आमदार शिल्लक आहेत. यामुळे राजकारणातील चाणक्य म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या शरद पवारांनी अहमदनगर काबीज करण्यासाठी आणि पक्षाची पुन्हा एकदा उभारणी करण्यासाठी ॲक्शन प्लान रेडी केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून शरद पवार गटाचे साईनगरी शिर्डीत अधिवेशन सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. शिर्डी आणि नगर दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ असलेला हा जिल्हा सध्या महायुतीच्या ताब्यात आहे.

शिर्डी मतदार संघात सध्या महायुतीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत. दुसरीकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र खासदार आहेत. दरम्यान, शिर्डीत आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार गट राष्ट्रवादी यांच्याकडून आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनात अहमदनगरच्या राज्यकारणाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता आहे.

मात्र, शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा आहे. माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यापैकी कोणीतरी एक ठाकरे गटाकडून उमेदवार राहील अशा चर्चा रंगत आहेत. यामुळे महाविकास आघाडी कडून आगामी लोकसभेसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळतं हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. अशातच आता मात्र उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार आहे.

कारण की, बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाचं सूचक वक्तव्य केल आहे. वास्तविक, घोलप यांच नाव गेल्या पंधरा वर्षांपासून या जागेसाठी चर्चेत येत राहिल आहे. पण ऐनवेळी त्यांच नाव कट होत आणि दुसऱ्यालाच उमेदवारी मिळते. दरम्यान याबाबतची खंत आता बबनराव घोलप यांच्या ओठावर येऊ लागली आहे.

घोलप यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये येथे शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. येथे निवडून येणारा खासदार हा माझ्यामुळे निवडून येतो. माझं नाव लोकसभा उमेदवारेसाठी चर्चेत असत पण उमेदवारीच्या वेळेस माझ्या नावाचा पत्ता कट होतो. यंदा मात्र तसे होणार नाही कुठल्याही परिस्थितीत शिर्डी लोकसभेत मी उमेदवारी अर्ज भरणार.

समर्थकांचा आग्रह वाढल्यास प्रसंगी अपक्ष उमेदवारी भण्याबाबतचा विचार सुरु आहे.” ऐन लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना बबनराव घोलप यांनी असं सूचक वक्तव्य दिल असल्याने नगरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे नंतर आता बबनराव घोलप ही बंड करणार, अशा चर्चा आता नगरच्या राजकारणात पाहायला मिळतं आहेत. यामुळे आता महाविकास आघाडी कडून या लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळते आणि याचे पडसाद नेमके कसे उमटतात हे पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe