Loan Information:- सध्या ऑनलाईनचे युग असून प्रत्येक गोष्ट ही झटक्यात ऑनलाइन पद्धतीने केली जाते. जर आपण आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत पाहिले तर आता अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासत नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अनेक बँकिंगची कामे आता करू शकतात.
यूपीआयच्या मदतीने तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यापासून तर तुमच्या खात्यात पैसे घेण्यापर्यंत, मोबाईलचा रिचार्ज असो किंवा इतर आवश्यक बिल भरणे असो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. परंतु या ऑनलाइन युगाच्या धामधुमीमध्ये सायबर गुन्ह्यांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
ज्याप्रमाणे एखाद्याच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने सायबर भामटे पैशांवर गंडा घालतात अगदी त्याचप्रमाणे सायबर क्राईमच्या माध्यमातून बरेच लोक दुसऱ्या व्यक्तींच्या नावावर कर्ज देखील काढू शकतात व अशाप्रकारे कर्ज काढण्याचे प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाल्याचे सध्या चित्र आहे.
दुसऱ्याच्या नावाने बनावट कर्ज घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु ज्या व्यक्तीच्या नावाने अशी कर्ज घेतलेले असते ते कर्ज मात्र त्या व्यक्तीला भरावे लागते. त्यामुळे तुमच्या देखील नावावर दुसरं कोणी कर्ज तर घेतलेले नाही ना हे तुम्हाला माहीत असणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे ते कसे माहिती करून घ्यायचे? याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
तुमच्या नावावर किती कर्ज आहे ते तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता
समजा तुमच्या नावावर किती कर्ज घेतली गेली आहेत हे तुम्हाला देखील चेक करायचे असेल तर तुम्ही सिबिल स्कोरच्या माध्यमातून ते आरामात तपासू शकतात. कारण सिबिल स्कोरमध्ये तुम्ही जे कर्ज घेतलेले असते त्या एकूण सर्व कर्जांचा संपूर्ण तपशील त्या ठिकाणी दिलेला असतो. या कर्जाच्या यादीमध्ये तुमच्या नावावर कोणतेही बनावट कर्ज असेल तर तुम्हाला त्याची माहिती सिबिल स्कोरच्या माध्यमातून मिळू शकते.
आपल्याला माहित आहेस की जेव्हा आपण कर्ज घ्यायला जातो तेव्हा बँकांकडून सिबिल स्कोर तपासला जातो. या सिबिल स्कोरच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीची आर्थिक पत किंवा त्याची स्थिती कशी आहे हे समजत असते. चांगला सिबिल स्कोर असेल तर ताबडतो तुम्हाला कर्ज दिले जाते.
परंतु सिबिल स्कोर जर घसरलेला असेल तर मात्र कर्ज मिळत नाही किंवा जास्त व्याजदराने ते मिळत असते. सिबिल स्कोर घसरण्यामागे तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर परत फेड न करणे किंवा तुमचे क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर न करणे इत्यादी बाबी कारणीभूत असतात.
सिबिल स्कोर कुठे तपासाल?
तुम्हाला देखील तुमचा सिबिल स्कोर तपासायचा असेल तर देशामध्ये अनेक क्रेडिट ब्युरो आहेत व त्या ठिकाणी तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट स्कोर विनाशुल्क तपासू शकतात. याशिवाय अनेक पद्धतीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून यावर देखील तुम्हाला सिबिल स्कोर तपासता येतो. तसेच बऱ्याच बँकांच्या एप्लीकेशन वर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर अगदी मोफत तपासण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
अशा पद्धतीने तुम्ही सिबिल स्कोरच्या माध्यमातून तुमच्या नावावर किती कर्ज आहे व त्यासोबतच काही बनावट कर्ज तर तुमच्या नावावर नाही ना? इत्यादी बाबी तपासू शकतात.