Farmer Success Story: 1 एकर आले लागवडीतून तब्बल 10 लाखांचे उत्पन्न! अशा पद्धतीने केले या शेतकऱ्याने आल्याचे व्यवस्थापन

Farmer Success Story:- जर आपण परंपरागत पिकांच्या तुलनेत विविध प्रकारचे वेगवेगळे भाजीपाल्याचे पीक तसेच मसाल्याचे पिके व फळपिकांचा  विचार केला तर तुलनेत योग्य व्यवस्थापन आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरपूर उत्पादन हाती येते.

हे अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून आले आहे.त्यामुळे आता शेतकरी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचे जोड देण्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेताना आपल्याला दिसून येतात. शेतकरी पारंपारिक पिकांसोबत प्रयोग म्हणून वेगवेगळ्या पिकांची शेती करतात व त्यामध्ये पारंपारिक पिकांपेक्षा प्रयोग म्हणून केले जाणारे तर पिकांची शेती ही फायद्याचे ठरताना दिसून येते.

अगदी याच मुद्द्याला  धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चिंचखोडा या गावचे शेतकरी राहुल डुबे यांचे उदाहरण पाहिले तर यांनी परंपरागत पिकांना आद्रक पिकाची जोड दिली व या त्याच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसून येत आहेत. त्यांचीच यशोगाथा या लेखात आपण बघणार आहोत.

 आले पिकातून मिळवले लाखोत उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चिंचखोडा येथील शेतकरी राहुल डुबे यांची घरची दहा एकर जिरायती शेती असून त्यातील एक एकर क्षेत्रामध्ये ते प्रत्येक वर्षी आद्रक पिकाचे उत्पादन घेतात व उरलेल्या शेतामध्ये कपाशी,तूर, मका व गव्हासारखी पिके घेतात व या सगळ्या पिकांच्या माध्यमातून ते चांगला पैसा मिळवत आहेत.

 आले पिकाचे व्यवस्थापन उत्पन्न

जर आपण राहुल यांचे आले पिकाचे व्यवस्थापन पाहिले तर ते एकरी तीन ते चार ट्रॉली शेणखत टाकून शेतीची मशागत करतात व त्यानंतर आले लागवड करतात. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे व त्यामुळे कमीत कमी पाण्यात व कमी कष्टात आले पिकाला पाण्याचे व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे.

या पिकासाठी खत व्यवस्थापन करताना ते सुरुवातीला निंबोळी पेंड, डीएपी तसेच सुपर फॉस्फेट व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये इत्यादींचा बेसल डोस देतात. तसेच कीड व बुरशीचा प्रादुर्भावानुसार आवश्यक फवारणी घेतात. मागच्या वर्षीचा विचार केला तर योग्य व्यवस्थापनाच्या बळावर त्यांनी एकरी 140 क्विंटल आल्याचे उत्पादन घेतले होते.

परंतु सुरुवातीला बाजार भाव कमी असल्याने  तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दराने त्यांना तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. कपाशी पिकाच्या तुलनेत विचार केला तर हे उत्पन्न जास्त मिळाल्याचे देखील राहुल यांनी सांगितले. जर मागच्या वर्षीचा विचार केला तर हंगामाच्या शेवटी आल्याचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल च्या पुढे होते.

यावर्षी जर त्या पद्धतीने बाजार भाव मिळाले तर यावर्षीचा राहुल यांचा अंदाज आहे की एकरी 150 क्विंटल आल्याचे उत्पादन याची शक्यता असून त्या माध्यमातून सरासरी नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न एका एकरात मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

अशा पद्धतीने परंपरागत पिकांना इतर पिकांची जोड देत व त्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने व्यवस्थापन करत कमीत कमी क्षेत्रामध्ये लाखोत उत्पन्न मिळवण्याची किमया राहुल यांनी साध्य केली आहे.