Gas Booking: आत्ता नका घेऊ गॅस बुकिंगचे टेन्शन! व्हाट्सअप वर करता येईल आता गॅसची बुकिंग, वाचा कशी आहे पद्धत?

Ajay Patil
Published:
gas booking

Gas Booking:- घरातील गॅस सिलेंडर संपल्यानंतर आपल्याला ते मिळवण्यासाठी गॅस बुकिंग करणे गरजेचे असते व त्याकरिता मोबाईल वरून गॅसची बुकिंग करावे लागते किंवा संबंधित एजन्सीला कॉल करून ती बुकिंग करता येते. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की अशा पद्धतीने गॅस बुकिंग करताना अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.

एजन्सीवर जाऊन गॅस बुकिंग करायचे म्हटले म्हणजे तिथे देखील बराच वेळ वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एकंदरीत जर पाहिले तर गॅस बुकिंग करणे  हे काम जर अवघडच असते. परंतु जर तुम्हाला अगदी आरामामध्ये घरी बसून जर गॅस बुकिंग करता आले तर किती छान होईल? असा प्रश्न कित्येक जणांच्या मनामध्ये येत असेल.

या अनुषंगाने जर आपण व्हाट्सअप चा विचार केला तर व्हाट्सअप हे आता नुसते चॅटिंग पुरते मर्यादित राहिलेले नसून ऑनलाइन ट्रांजेक्शन पासून तर आता अनेक प्रकारच्या बँकिंग सोयी सुविधा देखील व्हाट्सअपच्या माध्यमातून दिले जातात. त्याच्याही पुढे जात आता व्हाट्सअपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गॅसची बुकिंग सुद्धा अगदी करू शकणार आहात. अनेक गॅस रिफलीग कंपन्यांनी ही सेवा सुरू केली असून  त्यामुळे ग्राहकांना नक्कीच दिलासा मिळेल या शंकाच नाही.

 त्यासाठी हे क्रमांक ठरतील महत्त्वाचे

गॅस बुकिंगची सुविधा अनेक गॅस रिफिलिंग कंपन्या देत असून त्याकरता तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून फक्त व्हाट्सअप वर मेसेज पाठवावा लागेल व त्याकरिता तुमच्या घरामध्ये जर एचपी गॅस असेल तर तुम्हाला 9222201122, इंडेन गॅस असेल तर 7588888824 आणि भारत गॅस असेल तर 1800224344 या क्रमांकावर मेसेज पाठवून काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल व ती आवश्यक प्रक्रिया म्हणजे..

वर दिलेले नंबर अगोदर सेव्ह करणे गरजेचे आहे व व्हाट्सअप वर जाऊन त्या नंबर वर हाय असे पाठवा.. त्यानंतर तुमच्या भाषेची निवड करावी. त्यानंतर व्हाट्सअप वरच तुम्हाला नवीन कनेक्शन, गॅस बुकिंग इत्यादी पर्याय उपलब्ध होतील. येथील तुम्हाला गॅस बुकिंग करायचा असेल तर गॅस बुकिंगचा पर्याय निवडावा.

तुम्ही रिफील बुक केल्यानंतर स्थानिक सेवेनुसार तुमच्या घरी गॅस पोहोचतो. यामध्ये महत्त्वाचे असे आहे की ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुम्हाला घेता यावी म्हणून तुमचा मोबाईल क्रमांक त्या कंपनीकडे रजिस्टर असणे गरजेचे आहे. तसेच ई केवायसी करणे पण आवश्यक आहे. दोन्ही बाबी तुम्हाला संबंधित गॅस एजन्सीवर जाऊन करता येतील.

अशा पद्धतीने अगदी सोप्या रीतीने तुम्ही व्हाट्सअपचा वापर करून घरी बसून गॅस बुकिंग करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe