अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोरोनाची राज्यातील परिस्थीती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. केंद्र सरकारने जनतेला संकटाच्या काळात मदत केली मात्र राज्य सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.
रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करीत असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
पाथर्डी येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१९) तहसिलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले.यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. केंद्राच्या नरेंद्र मोदी सरकारने जनतेला मदत केली.
सर्वांसाठी विविध पँकेजही दिले आहे. राज्य सरकारने जनतेला काहीच दिले नाही. परराज्यातील मजुरांचे किती हाल चालु आहेत. कोरोना रोगाची परिस्थीती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
म्हणून मी व माझे सर्व पदाधिकारी सरकारचा निषेध करीत आहोत. शुक्रवार दि.२२ रोजी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रत्येक कार्यकर्ता स्वत:च्या घरासमोर उभे राहुन
आंदोलन करुन सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदविणार आहेत. सरकारने कोरोना रोगाचा सक्षमपणे मुकाबला करावा व सामान्य माणसाला आर्थिक पँकेज द्यावे अशी माझी मागणी असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, गोकुळ दौंड, रविंद्र वायकर, सोमनाथ खेडकर, नंदकुमार शेळके, अजय रक्ताटे, बंडु बोरुडे, मंगल कोकाटे,
माणिक खेडकर, अशोक चोरमले, प्रतिक खेडकर, बजरंग घोडके, काकासाहेब शिंदे, जनार्धन वांढकेर, अनिल बोरुडे, नामदेव लबडे, अजय भंडारी आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com