Pm Kisan Update: पीएम किसानचे आता 6 ऐवजी मिळणार 8 हजार? केंद्र सरकार करणार मोठी घोषणा? वाचा माहिती

Ajay Patil
Published:

Pm Kisan Update:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून शेतीचा विकास व्हावा या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.

यामध्ये सिंचनासाठीच्या योजना, कृषी यांत्रिकीकरणाशी संबंधित असलेल्या योजना, फळबाग लागवड अनुदान योजना सारख्या अनेक योजनांचा समावेश आपल्याला करता येईल. या योजनांमध्ये जर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विचार केला तर शेती कामामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून मदत व्हावी म्हणून

या योजनेचे महत्त्व अनन्य साधारण असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात म्हणजेच एका हप्त्यात दोन हजार रुपये असे वर्षात तीन हप्ते मिळून सहा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची यशस्वी व महत्त्वाकांक्षा योजना म्हणून ओळखली जाते. याच योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आलेली असून त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.

 पीएम किसानचे आता 6 हजार ऐवजी मिळणार 8 हजार

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारचे माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला जी रक्कम देण्यात येते ती रक्कम वाढवण्याचा विचार करत असून लवकरच शेतकऱ्यांना सहा ऐवजी आठ हजार रुपये वार्षिक मिळू शकतात.

म्हणजेच यामध्ये वर्षाला दोन हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता  काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. सरकार अर्थसंकल्प 2024 मध्ये गरीब तसेच शेतकरी, तरुण व महिलांना जास्तीची मदत देण्याचा विचार करत आहे. एवढेच नाही तर सरकारी विभाग एमएसएमईसाठी देखील आर्थिक मदत वाढवण्याच्या उद्देशाने योजना तयार करत असल्याचे वृत्त देखील सीएनबीसी-टीव्ही 18 ने दिले आहे.

आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 15 हप्ते वितरित करण्यात आलेले असून 15 नोव्हेंबर रोजी 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 2.81 लाख कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. त्यापुढे आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

  तुम्हाला देखील पीएम किसान योजनेशी असेल काही तक्रार किंवा समस्या तर या ठिकाणी करा संपर्क

तुम्हाला देखील पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या संबंधित कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800-1155-26( टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकतात. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना  [email protected] या ईमेल आयडीवर देखील संपर्क साधता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe