Tourist Place:- भारतामध्ये पाहिले तर अनेक पर्यटन स्थळे असून भारताला निसर्ग संपदा मोठ्या प्रमाणावर लाभली असल्याने प्रत्येक राज्यामध्ये अनेक निसर्ग संपन्न अशी पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जगाच्या पाठीवर देखील अनेक पर्यटन स्थळे आहेत.
हौशी पर्यटक भारतातच नव्हे तर विदेशातील पर्यटन स्थळांना देखील मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. परंतु असे काही पर्यटन स्थळे असतात की त्यामध्ये बऱ्याच बाबतीत साम्य असते व त्यामुळे पर्यटनासाठी निवड करताना गोंधळ उडतो. या अनुषंगाने असे अनेक पर्यटक असतात त्यांना समुद्राच्या सानिध्यामध्ये पर्यटन करण्याची आवड असते
व असे पर्यटक लक्षदीप किंवा मालदीव या ठिकाणी भेटी देतात. जर आपण मालदीव आणि लक्षद्वीप या ठिकाणांचा विचार केला तर सध्या वेगळ्या प्रकरणावरून ही दोन्ही ठिकाणे चर्चेत आहेत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती व याचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले होते.
परंतु यावर मालदीव सरकारमधील एका मंत्र्याने नको ती वादग्रस्त टीका केली व त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मालदीव विरुद्ध लक्षद्वीप असा मोठा वाद रंगल्याचे चित्र आहे. परंतु याही परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पर्यटन करणाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी दोघांपैकी कोणते ठिकाण चांगले राहील किंवा दोघांपैकी फिरण्यासाठी कोणते ठिकाण स्वस्तात मस्त आहे. याबाबतची माहिती आपण या लेखात बघू.
काही गोष्टींनी लक्षद्वीप आणि मालदीव यामधील फरक समजून घेऊ
लक्षद्वीप आणि मालदीव या दोन्ही ठिकाणांचा विचार केला तर हे समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेले ठिकाणे आहेत. यामध्ये मालदीवला तब्बल 300 बेटे म्हणजेच आयलँड असून लक्षद्वीप या ठिकाणी 36 आयलँड आहेत. सध्या तुम्हाला पाच ते सात दिवसांची ट्रिप आयोजित करायची असेल तर तुम्ही ती मालदीव येथे प्लॅन करू शकतात व त्या तुलनेत पाच ते सहा दिवसांच्या सुट्टीसाठी किंवा पर्यटनासाठी लक्षद्वीप चांगले ठरते.
फिरण्यासाठी लागणारा खर्च
तुम्हाला मालदीवला ट्रिपसाठी जायचे असेल तर तुमच्याकडे कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच लाखांचे बजेट हवे. त्यातल्या त्यात तुम्ही मालदीवला जर एखादे महागडे रिसॉर्ट बुक केले तर मात्र हा बजेट वाढण्याची शक्यता अधिक आहे. तुम्हाला जर तुमच्या आवडत्या रिसॉर्टवर जायचे असेल तर या ठिकाणी स्पीड बोट किंवा सी प्लॅनने तुम्हाला जायला लागते
व त्याकरता जवळपास 20 हजार रुपये इतका खर्च येतो. मालदीव मध्ये तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स व इतर काही महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्याकरिता 35 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. मालदीव मध्ये इतर ऍक्टिव्हिटीचा विचार केला तर यामध्ये काइट सरपिंग तसेच फन ट्यूबिंग, वेक बोर्डिंग, स्पा ट्रीटमेंट आणि सेंड बॅक पिकनिक सारख्या गोष्टींचा तुम्ही आनंद लुटू शकतात
या तुलनेत तुम्ही लक्षद्वीपचा विचार केला तर हे अल्हाददायक व अतिशय शांत असलेले समुद्रकिनारा असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी ट्रॅव्हलिंग सोडून चार दिवस आणि तीन रात्रीचे पर्यटनाकरिता वीस हजार रुपये खर्च येतो. त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणाच्या कल्पेनी,
कावरत्ती आणि मिनीकॉय सारख्या बेटावर पाच दिवसाच्या सहलीसाठी जायचे असेल तर एका व्यक्तीसाठी 37 हजार पाचशे रुपये इतका खर्च येतो. लक्षदीपला तुम्ही सनबाथचा आनंद लुटू शकतात तसेच स्नोकर्लीग, स्कुबा डायविंग आणि निसर्गाची उधळण केलेली अनेक ठिकाणी तुम्ही पाहू शकतात.