Cibil Score: तुम्हाला माहिती आहे का तुमचा सिबिल स्कोर कोण तयार करते? त्यासाठी कोणता आधार वापरला जातो?

Ajay Patil
Published:
Cibil Score

Cibil Score :- सिबिल स्कोर हा बँकिंग व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असलेला आणि संबंधित व्यक्तीसाठी बँकेच्या माध्यमातून एखादे कर्ज मिळवण्यासाठी एक विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

जेव्हा आपण एखाद्या बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेमध्ये कर्ज घेण्यासाठी अर्ज करतो तेव्हा सगळ्यात अगोदर बँकेच्या माध्यमातून आपला क्रेडिट स्कोर तपासला जातो. सिबिल स्कोर हा कर्ज घेण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे. तितकाच आपण घेत असलेल्या कर्जाचा व्याजदरावरही त्याचा मोठा परिणाम होत असतो.

म्हणजेच एकंदरीत जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज कमीत कमी वेळेत व चांगले व्याजदरात मिळते. परंतु जर सिबिल चांगला नसेल तर मात्र कर्ज मिळणे अवघड होते व मिळाले तरी ते जास्तीत जास्त व्याज दरात मिळते.

परंतु आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडत असेल की नेमका आपला क्रेडिट स्कोर कोणत्या आधारावर तयार केला जातो किंवा कोण तयार करतो? तर याच महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात घेणार आहोत.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट अर्थात सिबिल स्कोर कोण तयार करत असते?

यासाठी सर्व क्रेडिट ब्युरोच्या माध्यमातून तुमचा क्रेडिट रिपोर्ट जारी केला जातो व या क्रेडिट ब्युरोचा विचार केला तर यामध्ये ट्रान्स युनियन सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपेरियन आणि सीआरआयएफ हायमार्क यासारख्या कंपन्यांकडे याचे प्रमुख काम आहे किंवा या कंपन्या यामध्ये प्रमुख मानले जातात.

या कंपन्यांना लोकांच्या आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत असलेल्या नोंदी गोळा करण्यासाठी, त्या नोंदणीची देखभाल करण्याकरिता व या डेटावर आधारित क्रेडिट अहवाल किंवा सिबिल स्कोर तयार करण्यासाठी परवाना देण्यात आला असून या क्रेडिट ब्युरो कंपन्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडे जमा झालेला ग्राहकांचा डेटांचे मूल्यांकन करतात.

या मूल्यांकनांमध्ये प्रामुख्याने संबंधित व्यक्तीचे थकीत कर्जाची रक्कम, कर्ज परतफेडीच्या नोंदी तसेच नवीन कर्ज, क्रेडिट कार्ड करिता अर्ज आणि इतर क्रेडिट संबंधित माहिती तपासून त्यावर आधारित या कंपन्या सिबिल स्कोर तयार करत असतात.

तुमचा सिबिल स्कोर तयार करण्याकरिता कोणत्या घटकांचा विचार केला जातो?

1- जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कर्ज घेतात किंवा क्रेडिट कार्ड घेता तेव्हापासून तुमचा क्रेडिट इतिहास तयार होण्यास सुरुवात होते. तुमचा क्रेडिट किंवा सिबिल स्कोर तयार करत असताना तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा सर्वप्रथम विचार केला जातो. तुमच्या क्रेडिट हिस्टरी वरून कळते की तुमचा क्रेडिट इतिहास किती जुना आहे आणि तुमचा परतफेडीचा रेकॉर्ड कसा आहे? सगळ्या क्रेडिट हिस्टरीचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होत असतो.

2- दुसरा घटक म्हणजे तुमचा सिबिल तयार करत असताना सीयुआर म्हणजेच क्रेडिट युटीलायझेशन रेशो देखील पाहिला जातो. हा रेशो म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डच्या क्रेडिट मर्यादेची किती टक्केवारी वापरली आहे किंवा क्रेडिट कार्डच्या एकूण मर्यादेच्या किती खर्च करत आहात याचा यामध्ये समावेश होतो. समजा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या कार्डच्या एकूण मर्यादेपैकी तुम्ही तीस टक्के वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरची खरेदी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करू नये. तुम्ही जास्त क्रेडिट कार्डचा वापर केला तर यावरून असे दिसून येते की तुम्ही क्रेडिट कार्डवर जास्त करून अवलंबून आहात व या परिस्थितीचा फायदा नक्कीच तुमच्या सिबिल वर होत असतो.

3- तसेच अगोदर तुम्ही किती असुरक्षित कर्ज आणि किती सुरक्षित कर्ज घेतले आहेत यावरून देखील तुमचे क्रेडिट मिक्स दिसून येत असते. यामध्ये तुमचे क्रेडिट मिश्रण संतुलित असणे खूप गरजेचे आहे. म्हणजे जर तुम्ही पर्सनल लोन व क्रेडिट कार्ड इत्यादी कर्ज अनेक वेळा घेतले असतील तर या माध्यमातून दिसून येते की तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे आणि तुम्ही क्रेडिटवर जास्त करून अवलंबून आहात. तसेच दुसऱ्या बाजूने पाहिले तर तुम्ही आवश्यकतेनुसार सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज घेत असाल आणि ते सर्व वेळेवर भरले असेल तर यावरून दर्शवले जाते की तुम्ही सर्व प्रकारचे कर्जाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करत आहात व ते फेडण्यास तुम्ही सक्षम आहात. त्यावर देखील तुमचा सिबिल स्कोर अवलंबून असतो.

4- तसेच महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचदा आपण कर्ज घेतलेले असते व ते परतफेड करताना आपण त्या कर्जामध्ये ओटीएस म्हणजेच वन टाइम सेटलमेंट करतो. तसेच एखाद्याच्या कर्जाचे जामीनदार असतो आणि ते कर्ज फेडले जात नाही.या सगळ्या गोष्टींचा देखील परिणाम हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर होतो व त्यामुळे तुमचा सिबिल घसरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe