Income Tax Department Bharti 2024 : 10 वी, 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; मुंबईत ‘या’ ठिकणी भरती सुरु !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Department Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. मुंबई आयकर विभागा अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकता.

आयकर विभाग मुंबई अंतर्गत “इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA)” पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वगवगेळी असेल, येथे १० वी,  १२ वी आणि पदवीधर उमेदवारांना संधी दिली जाईल, पदांनुसार पात्र उमेदवारांनीच येथे अर्ज सादर करायचे आहेत. यासाठी वयोमर्यादा देखील वेगवगेळी असेल. 18 ते 30 वर्षापर्यंत उमेदवार येथे अर्ज सादर करू शकतो.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज https://mumbai-itax-sportsrecr23.com/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. अर्जासोबत अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असेल, अर्ज शुल्क 200/- रुपये इतके असतील. कोणत्याही उमेदवाराने अर्ज शुल्क भरले नाही तर अर्ज अपूर्ण मानला जाईल. या भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट vvww.incometaxmumbai.gov.in ला भेट देऊ शकता.

असा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
-अर्ज देय तारखे अगदोर सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.