PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, ताबडतोब करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Bharti 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठीही सुवर्णसंधी असेल, या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आठवडयातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल, तरी मुलाखतीस जाण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा. या भरतीसाठी मुलाखत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८ येथे आयोजित करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या या भरतीसाठी वयोमर्यादा 70 वर्षे इतकी आहे. भरती संबंधित अधिक माहिती हवी आसल्यास अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in/ ला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
– मुलाखत आठवडयातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता सुरु होईल.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.