श्रीक्षेत्र अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील फक्त ‘या’ 2 लोकांना मिळाले आमंत्रण, कोणाला मिळाला सन्मान ?

Published on -

Ram Mandir : गेली अनेक वर्ष न्यायालयात खटला चालल्यानंतर अखेरकार सर्वोच्च न्यायालयाने श्रीक्षेत्र आयोध्या हे प्रभू श्रीरामांचेच जन्मस्थान असल्याचा निकाल दिला आहे. हा निकाल आल्यानंतर सर्व देशात आनंदाचे वातावरण होते.

रामभक्त सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे खूपच खुश होते. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्या येथे भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण देखील सुरू आहे. प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे निर्माण कार्य आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भव्य दिव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.

22 जानेवारीला हा सोहळा पार पडणार असून राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर हे मंदिर तमाम राम भक्तांसाठी खुले होणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशात मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यामुळे या मंदिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा खूपच नेत्रदीपक राहणार आहे.

या कार्यक्रमाला देश-विदेशातील अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत. यासाठी मान्यवरांना निमंत्रण देखील देण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांना या सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. यासाठी देशातील हजारो साधू संत, व्यावसायिक, राजकारणी, समाजकारणातील लोक, विविध क्षेत्रातील जाणकार लोक, हिंदू सनातन धर्मासाठी कार्य करणाऱ्या लोकांना, बॉलीवूडमधील कलाकारांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये या सोहळ्यासाठी कोण-कोणत्या दिग्गज लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे याबाबत सध्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील एका सरपंचाला देखील आमंत्रण देण्यात आले आहे.

जगभरातील दिग्गजांना या सोहळ्यासाठी बोलवण्यात आले असून या दिग्गज मंडळींमध्ये महाराष्ट्रातील एका खेडेगावातील सरपंचाला आमंत्रण मिळाले असल्याने सध्या या सरपंचाची संपूर्ण राज्यात चर्चा पाहायला मिळत आहे. अखेरकार हा सरपंच कोण आहे याची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या सरपंचाला मिळाला राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान ?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील हिवरे बाजार गावाचे सरपंच पोपटराव पवार यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. खरे तर हिवरे बाजार हे गाव आदर्श गाव आहे. पवार यांनी या गावाचा संपूर्ण कायापालट केला आहे.

ते एक नावाजलेले सरपंच असून त्यांच्या कार्याची अनेकांनी दखल घेतलेली आहे. देश-विदेशातील अनेक मान्यवर लोकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांतून हिवरेबाजार आज परिपूर्ण गाव बनले आहे. या गावात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

यामुळे या गावाची आणि येथील सरपंचाची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. दरम्यान या नावाजलेल्या सरपंचाला राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला आमंत्रण पाठवण्यात आले आहे. यावरून त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर देखील घेण्यात आली आहे हे स्पष्ट होत आहे.

पोपटराव पवार यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. नासिक विभागातील एकूण दहा नामवंतांना या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले असून या दोघांचा या दहा लोकांमध्ये समावेश होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News