अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोविड १९ च्या महामारीवर प्रभावी उपाययोजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याने राज्यात आरोग्य अराजक पसरले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा राज्यात वाढत चालला आहे. कोरोनाचा विषाणू अकार्यक्षम, सुस्त सरकारी यंत्रणेला पोखरून काढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
भाजपाचा एक एक कार्यकर्ता दिवसरात्र जनसेवा करत आहे. आता लोकांच्या जीवावर उठलेल्या मुर्दाड सरकारच्या विरोधाचे, निषेधाचे मार्ग अवलंबणे अनिवार्य बनले आहे,अशा आशयाचे निवेदन राहुरी तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, हे अकार्यक्षम सरकार वठणीवर आणायचे असेल तर सरकारचा जाहीरपणे निषेध व्हायलाच हवा. त्यासाठीच हे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे.
वास्तविक या आरोग्य आणीबाणीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांनी समान पातळीवर येऊन काम करणे अपेक्षित होते. पण दुर्दैवाने सरकारला नुसता दिखावा करायचा आहे. काम नाही.
जनतेचे दुर्भाग्य म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेला मृत्यूशय्येवर नेणाऱ्या सरकारला आता जाब विचारायची गरज आहे. यावेळी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, शहराध्यक्ष राजेंद्र उंडे, युवक अध्यक्ष रविंद्र म्हसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com