‘या’ धोरणानुसार श्रीरामपुरातील बाजारपेठ आणि व्यवहार चालू होणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा सुरळीत होण्याकरिता आज प्राशकीय कार्यालयात लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

त्यानुसार शहरात विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावेत या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

यावेळी बैठकीस खा.सदाशिवराव लोखंडे,आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार,

तहसीलदार प्रशांत पाटील, डीवायसपी राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.समीर शेख,वाहतूक शाखेचे श्री.देशमुख आदी उपस्थित होते.

कोरोना नंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधी नंतर श्रीरामपूरची बाजारपेठ सुरु करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती.

ना.थोरात यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन श्रीरामपूरातील व्यवहार चालू केले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाने बाजारपेठ बंद झाली होती.

सर्व शासकीय नियमांचे पालन करुन योग्य ती उपाययोजना करुन सर्व प्रकारची खबरदारी घेऊन श्रीरामपूरच्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची काळजी घेऊन श्रीरामपूरातील बाजारपेठ सुरळीतपणे चालू व्हावी याकरिता उपस्थितीत असलेले लोकप्रतिनिधी आग्रही होते.

त्यानुसार विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावे या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार आहे. आज पर्यंत श्रीरामपुरातील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न करुन श्रीरामपूर शहर व तालुक्याची परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली आहे.

त्यामुळे बाजारपेठ चालू झाल्यानंतर खबरदारी घेऊन बाजारपेठ चालू करावी. जनतेने आणि व्यापाऱ्यांनी शासकिय नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment