Ahmadnagar Breaking : एमआयडीसीतील तरुणाच्या खून प्रकरणी दोघा जणांना २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे व रोहित प्रकाश पाटोळे असे अटक करण्यात आलेल्या दोघा इसमांचे नाव आहे.
ते वडगाव गुप्ता येथील दत्तनगर परिसरातील रहिवासी आहेत. एमआयडीसी पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

१५ जानेवारी रोजी वडगाव गुप्ता शिवारातील शेंडी बायपास रोडवर शुभम सोनवणे याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादी अनिकेत अशोक सोनवणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादविकच्या ३०२, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्यातील आरोपी बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे व रोहित प्रकाश पाटोळे यांना तत्काळ अटक करण्यात आली. आरोपींना राहुरी येथे गजाआड करण्यात आले.
जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजेंद्र सानप, पोसई. दिपक पाठक,
पोहेकॉ. नंदकुमार सांगळे, पोहेकॉ. नितीन उगलमुगले, साबीर शेख, राजू सुद्रीक, महेश बोरूडे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सचिन हरदास, शेरकर, चव्हाण, राठोड, पोकॉ. राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.