Ahmednagar Politics : श्रेय मिळण्याच्या भितीने माझ्या विरोधकांनी कर्जतची एमआयडीसी रोखली !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मंत्री नितीन गडकरी यांना भेटून प्रलंबित असलेले श्रीगोंदा – जामखेड – व नगर – सोलापूर रस्त्याची कामे मार्गी लावली असून, यापुढेदेखील आपण विकासाची कामे करत राहणार आहे.

मला श्रेय मिळण्याच्या भितीने माझ्या विरोधकांनी कर्जतची एमआयडीसी रोखली असल्याची टीका, आमदार रोहित पवार यांनी केली.

तालुक्यातील कोंभळी येथे ६१२ लक्ष रुपये खार्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.

येथील कोंभळी – कौडाणे ते बिटकेवाडी रोड, निमगाव गांगर्डा ते बारडगाव सुद्रीक रोड कोंभळी रवळगाव ते रोटेवाडी रोडचे भूमिपूजन तसेच खुली व्यायाम शाळा लोकार्पण समारंभ नुकताच पार पडला.

या वेळी मा. जि.प. सदस्य गुलाब तनपुरे, कोंभळीचे सरपंच सचिन दरेकर, उद्योजक सुरेश गोरखे, रावसाहेब गांगर्डे, मारुती गांगर्डे, रुपचंद गांगर्डे, चांदमल गांगर्डे महेश काळे तात्या ढेरे विठ्ठल गांगर्डे, सुनिल खंडागळे, विनायक भापकर,

वसंत गांगर्डे, नितीन गांगर्डे, शिवाजी गांगर्डे, अमोल गांगर्डे, शरद भापकर, शिवाजी भापकर, संदीप भापकर, भाऊसाहेब काकडे, धनराज गांगर्डे, बाळासाहेब गांगर्डे, निखिल गांगर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, कोंभळी गावात आ. पवार यांच्या माध्यमातून विकासाची कामे करत असताना पुढील काळात झालेल्या विकास कामातून कोंभळी गावचा कायापालट झाल्याचे दिसेल. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.