Ahmednagar Politics : लोकसभेनंतर विधानसभेची गणितेही बदलू लागली. लोकसभेतील मतांचे गणिते पाहता भाजपसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान नगर शहरात आ. संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे अर्थात महायुतीचे आमदार आहेत.
असे असले तरी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी पंकजा मुंडे यांनी नगरमधून विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आगामी काळात भाजप नेत्या पंकजा मुंडे या नगर शहरातून उभ्या राहतील, तसेच जगताप – मुंडे अशी फाईट होईल अशा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान आता स्वतः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीच याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे
अहमदनगर अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार झालेला नाही. नगर शहर जिल्हाध्यक्षांच्या भावनांचा आदर आहे. परंतू, निवडणुकीबाबत काही ठरलेले नाही, असे स्पष्टीकरण भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिले. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी पंकजा मुंडे यांनी नगरमधून विधानसभेची निवडणूक लढवावी,
अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपमध्येच दोन विचारप्रवाह समोर आले होते. त्यावर मुंडे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान त्या काल रविवारी छत्रपती संभाजीनगर येथून आष्टीकडे जात असताना नगरमध्ये थांबल्या होत्या. यावेळी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.
माजी आ. कर्डिलेंकडून स्वागत
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नगर शहरात आल्यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे त्यांनी स्वागत केले. यावेळी अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर त्या प्रथमच शहरात त्यांचे आगमन झाले.
यावेळी त्यांनी कार्यकर्तांना देखील पराभवाने खचून न जाता भावनाविवश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केलेय.
जगताप-मुंडे सामना नाहीच?
जगताप – मुंडे अशी फाईट होईल अशा चर्चा रंगलेल्या असतानाच आता स्वतः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीच याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता आगामी काळात जगताप-मुंडे सामना होईल ही शक्यता धूसर झाली आहे.