देशात जर आपण कार उत्पादक कंपन्या बघितल्या तर त्यामध्ये सर्वात मोठी कंपनी म्हणून मारुती सुझुकीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागतात. भारतीय ग्राहकांमध्ये मारुती सुझुकी ही कंपनी खूपच प्रसिद्ध व लोकप्रिय आहे व या कंपनीच्या गाड्यांना ग्राहकांमध्ये देखील प्रचंड प्रमाणात मागणी असल्याचे आपल्याला दिसून येते.
मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा किमतींमध्ये चांगली वैशिष्ट्ये व मायलेज असणाऱ्या कार बाजारपेठेमध्ये लॉन्च केले जातात व प्रत्येक कारला ग्राहकांकडून तितकेच मोठ्या प्रमाणावर मागणी येते. भारतातील आणि जगातील ज्या काही प्रमुख कार उत्पादक कंपन्या आहेत त्यांना तगडी टक्कर मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून देण्यात येते.
याच प्रमाणे जर आपण बघितले तर मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून आपल्या प्रसिद्ध असलेल्या हॅचबॅक कार मारुती स्विफ्टचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल म्हणजेच मारुती सुझुकी स्विफ्ट 2024 लॉन्च करण्यात आलेली आहे. तसे पाहायला गेले तर मारुती स्विफ्ट ने 2005 यावर्षी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता व तेव्हापासून ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली होती.
परंतु आता मारुती सुझुकीने स्विफ्ट चे चौथ्या पिढीतील मॉडेल बाजारात आणले असून ते बाजारात खूप धमाल करत आहे. विशेष म्हणजे मारुतीच्या या नवीन स्विफ्ट ने सर्वाधिक विक्री करत आपले पहिले स्थान तयार केले आहे व दोन नंबर वर टाटा पंच आहे. जर आपण मारुती स्विफ्ट 2024 ची मे महिन्यातील विक्री पाहिली तर ती 19393 युनिट्स इतकी आहे. म्हणजेच देशातील पंच आणि क्रेटा सारख्या अनेक कार्सना मारुती सुझुकी स्विफ्ट 2024 ने विक्रीच्या बाबतीत मागे टाकलेले आहे.
कसा आहे या नवीन स्विफ्ट कारचा लुक?
जर आपण या नवीन स्विफ्ट कारची डिझाईन पाहिली तर यामध्ये अनेक नवीन डिझाईन आणि छोटे बदल करण्यात आलेले आहेत व त्यामुळे तिचा लूक पूर्वीपेक्षा खूप सुंदर दिसतो. समोर प्रोजेक्टर सेटअप्स शार्प दिसणारे हेडलॅम्प देण्यात आलेले आहेत. तसेच दोन हेडलॅम्प मध्ये गडद क्रोम फिनिशसह हनीकॉम्ब पॅटर्नसह काळी ग्रील देण्यात आलेली आहे व कंपनीचा लोगो या ग्रीलच्या वर आणि बोनेटच्या अगदी खाली दिला आहे.
तसेच या कारमध्ये बंपर देखील बदलण्यात आला आहे. मात्र साईड प्रोफाईल मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. मागच्या बाजूचे टेल लाईट्स आता अगोदर पेक्षा लहान आणि स्पोर्टयर देण्यात आलेले आहेत.
तसेच या कारचा डॅशबोर्ड पाहिला तर तो काळ्या आणि पांढऱ्या ड्युअल थीमसह आहे. तसेच यात 9.0- इंचाची फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. तसेच वायरलेस एप्पल कार प्ले / अँड्रॉइड ऑटो, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, स्टेरिंग माउंट कंट्रोल आणि स्वयंचलित हवामान नियंत्रण यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
कसे आहे या कारचे इंजिन?
या नवीन स्विफ्टमध्ये सर्व नवीन Z सिरीज 1.2 लिटर, तीन सिलेंडर, नॅचरल ऍस्पिरिटेड पेट्रोल इंजिन आहे. तसेच मारुती सुझुकीचा याबद्दल दावा आहे की नवीन स्विफ्ट एमटी प्रकार 24.8 kmpl आणि एएमटी प्रकार 25.75 kmpl चे मायलेज देते. तसेच हे नवीन इंजिन ८२ एचपी पावर आणि 112 एनएम टॉर्क देते.
सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेली वैशिष्ट
मारुती सुझुकीच्या या नवीन स्विफ्टच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअर बॅग, हिल होल्ड कंट्रोल आणि थ्री पॉईंट सीट बेल्ट मानक आहेत. विशेष म्हणजे ही नऊ रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सिझलिंग रेड, पर्ल आर्टिक व्हाईट, मॅग्मा ग्रे आणि शानदार सिल्वर अशा रंगांचा समावेश आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट LXi, VXi, ZXi, ZXi प्लस ZXI Plus DT या पाच प्रकारात उपलब्ध आहे.
किती आहे या नवीन मारुती स्विफ्ट 2024 ची किंमत?
मारुती सुझुकीच्या या चौथ्या जनरेशनच्या मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.5 लाखापासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत नऊ लाख 65 हजार रुपये इतकी आहे.