Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान मुलींच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील या गेल्या असता मुलींच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून त्यांना देखील गहिवरून आले.
प्रवरेच्या तीन विद्यार्थिनींचे जाणे हि बाब अतिशय वेदनादायी असून या संकटात विखे पाटील परीवार तुमच्या समवेत असल्याचे सांगत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी या कुटुंबियांना आधार दिला.
संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबियांची भेट घेवून शालिनीताई विखे पाटील यांनी त्यांना आधार दिला आहे.तसेच पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यामातून शासकीय मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
शनिवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे दुपारी तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यातील अनुष्का बढे आणि सृष्टी ढापसे या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थीनी होत्या.
या दुर्दैवी घटनेचे दुख प्रवरा परीवाराला झाले. पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेबद्दल दुख व्यक्त करून कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी रविवारी (दि.१६) मेंढवण येथे या कुटुंबियांची भेट घेवून या संपूर्ण संकटात विखे पाटील परीवार तुमच्या समवेत असल्याचे सांगितले.
दरम्यान कोणत्याही मदतीने हे नुकसान भरून येणारे नाही. तरीही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना असलेल्या शासकीय योजनेतून मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ, श्रीनिवास साबळे, दादा गुंजाळ, राहुल भोईर, नवनाथ साबळे, नवनाथ कानकाटे, गणेश वराडे, नंदू ढापसे, कारभारी बढे, भारत काळे आदी उपस्थित होते.