Mumbai Indians : आयपीएल 2024 ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण यावेळी संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत, अशातच मुंबई इंडियन्स देखील खूप चर्चेत आहे. जेव्हा पासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे, तेव्हा पासून सर्वत्र फक्त याचीच चर्चा आहे. अशातच पाच वेळाची चॅम्पियन मुंबई हार्दिकच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ट्रॉफी पटकावेल का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
चाहत्यांची आयपीएल 2024 ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, लवकरच 10 संघ ट्रॉफीसाठी आमनेसामने येतील. MI चा संघ देखील 2024 च्या मोसमासाठी सज्ज आहे, परंतु यावेळी हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघात काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

यावेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. अशातच मुंबईचा हा निर्णय कितपत योग्य ठरतो, हे स्पर्धेतूनच कळेल, कारण रोहितने कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्ससाठी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. दुसरीकडे पण हार्दिक पांड्याकडेही मुंबई इंडियन्समध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले, त्यामुळे हा बदल यावेळचा संघातील सर्वात मोठा बदल मानला जात आहे.
IPL 2024 च्या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सने 8 खेळाडूंना 16.70 कोटी रुपयांना खरेदी केले आहे, MI ने दक्षिण आफ्रिकेच्या गेराल्ड कोएत्जीला सर्वाधिक 5 कोटी रुपये देऊन, तर श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाला 4.60 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. याशिवाय नुवान तुषारा 4.80 कोटी, मोहम्मद नबी 1.50 कोटी, श्रेयस गोपाल 20 लाख, अंशुल कंबोज 20 लाख आणि शिवालिक शर्मा 20 लाख देऊन संघात सामील झाले आहेत.
अशास्थितीत मुंबई इंडियन्स संघ खूपच मजबूत दिसत आहे. यावेळी संघाने स्थानिक आणि परदेशी खेळाडूंचा उत्तम मेळ साधला आहे. फलंदाजी पूर्वीपेक्षा मजबूत दिसते, तर गोलंदाजीही पूर्वीपेक्षा मजबूत दिसते. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, तिलक वर्मा, इशान किशन सारखे फलंदाज संघाला मजबूत करतात, तर हार्दिक पांड्या,दिलशान मदुशंका सारखे अष्टपैलू खेळाडू संघासाठी संतुलन निर्माण करतात, त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी हे देखील संघ मजबूत करताना दिसत आहेत.
यावेळी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ ओपनिंगपासून फिनिशिंगपर्यंत मजबूत दिसत असला तरी अनेकदा लाढ्य दिसणारा संघ मैदानावर विखुरला जातो. अशा स्थितीत कर्णधार बदलानंतर मुंबईवर जुन्या मोसमाप्रमाणे कामगिरी करण्याचे दडपण असेल.
मुंबई इंडियन्स संघ :-
हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, टिम डेविड, विष्णु विनोद, गेराल्ड कोएत्जी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज, नुवान तुषारा, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, आकाश मधवाल, अर्जुन तेंदुलकर, डेवाल्ड ब्रेविस, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंह, तिलक वर्मा, नेहल वढेरा, पीयूष चावला, रोहित शर्मा, रोमारियो शेफर्ड, शम्स मुलानी.