मुंबई दि २०: कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन येथे आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.
या बैठकीत यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले.
अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.