ग्रहांच्या गोचर किंवा संक्रमणामुळे तसेच राशी बदलामुळे बारा राशींवर वेगवेगळ्या प्रकारचा प्रभाव पडत असतो. कधी हा पडणारा प्रभाव चांगला असतो किंवा काही प्रमाणात नुकसानदायक देखील ठरू शकतो. तसेच ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग देखील या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तयार होत असून त्यांचा देखील सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा त्या त्या राशींवर होताना आपल्याला दिसून येणार आहे.
याच पद्धतीने जर आपण राहू या ग्रहाचा विचार केला तर हा ग्रह प्रत्येक दीड वर्षांनी राशीत बदल करत असतो व तो शनीच्या प्रभावासारखाच मानला जातो. 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहूने मेष राशीतून मीन राशित प्रवेश केला आणि आता राहू हा मीन राशीतच राहणार आहे. यापुढील राहूचे संक्रमण हे 2025 मध्ये होईल. तोपर्यंत राहू मुळे काही राशींवर अशुभ प्रभाव पडणार आहे. या अनुषंगाने राहूच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांना त्रास होऊ शकतो? त्याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
राहुलच्या संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होऊ शकतो त्रास
1- कन्या– कन्या राशींच्या व्यक्तींकरिता राहुचे हे संक्रमण खूप अडचणीचे ठरू शकते. यामुळे वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक भागीदारीवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कन्या राशींच्या व्यक्तींनी मालमत्ता किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे टाळणे हितावह राहील. कुटुंबामध्ये देखील वाद निर्माण होऊ शकतात. तसेच आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
2- सिंह– राहूचे मीन राशीतील संक्रमण हे सिंह राशींच्या लोकांसाठी देखील फायदेशीर राहील अशी स्थिती नाही. सिंह राशींच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच जोडीदाराबरोबर वादाची परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. एवढेच नाही तर आर्थिक नुकसान देखील होण्याची दाट शक्यता असल्यामुळे गुंतवणूक करणे टाळावे.
3- मीन– राहुचे या संक्रमणामुळे मीन राशींच्या लोकांसाठी काही संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. मीन राशींच्या व्यक्तींबद्दल म्हणायचे झाले तर आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तसेच आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे राहील. कुटुंबाशी संबंधित काही खर्च देखील वाढू शकतो. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमच्या सीनियर सोबत काही मतभेद होण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे व सावधगिरी बाळगावी.
( टीप– वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करीत नाहीत.)