अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- जामखेडचा गुटखामाफिया अंबड पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी रोहिलागडच्या कानिफनाथ आश्रमातून सात लाखाचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
येथील मृत पुजाऱ्याच्या आश्रमातील खोल्या ताब्यात घेऊन करीत होता, त्याचा हा गोरखधंदा जोरात सुरु होता. अंबड पोलिसांनी भल्या पहाटे रोहिलागड व जामखेड येथे धाडसत्र केले.
अंबडचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना रात्र गस्तीवर असतांना रोहिलागड शिवारातील पुजारी मृत पावल्यामुळे बंद असलेल्या कानिफनाथ आश्रमात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.
पहाटे 2 वाजेच्या सुमारास या आश्रमातील एका खोलीवर पोलिसांनी धाड टाकून झडती घेतली असता, त्या खोलीत विविध गुटख्याचा मोठा साठा आढळून आला.
हा गुटखा साठा जामखेड येथील गुटखामाफिया अनिल भोजने याच्या मालकीचा असल्याचे कळताच त्याच्या घरावरही पोलिसांनी धाड टाकली.
यावेळी दोन्ही धाडीत सुमारे ७ लाख रुपये किमतीचा 46 पोते गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. रोहिलागड शिवारातील कानिफनाथ आश्रमाचे साधक व पुजारी असलेल्या पती-पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.
त्यामुळे हा आश्रम बंद होता. मयत पुजारी दाम्पत्य हे गुटखामाफियाचे नात्याने मावशी व मावसा होते, त्यामुळे त्याने या आश्रमातील काही खोल्या ताब्यात घेऊन त्याचा गोडाऊन म्हणून उपयोग करीत होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com