Lord Ram Good Qualities : अयोध्यामध्ये बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या राम मंदिरामध्ये आज प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठे मंदिर म्हणून आता राम मंदिराला ओळखले जाईल.
पुरुषत्वाचे प्रतिक आणि सनातन धर्माचे उपासक प्रभू राम यांच्या चारित्र्यामध्ये ७ गुण होते ज्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हंटले जायचे. प्रभू श्री रामाचे हे गुण स्वीकारून तुम्ही देखील जीवनात यशस्वी व्हाल.
प्रभू श्री रामाने 14 वर्षे वनवास भोगूनही त्यांनी सन्मान, दयाळूपणा, सत्य, करुणा, धर्म यांसारखे आचरण कधीही सोडले नाही. त्यामुळे रामाला सर्वश्रेष्ठ राजा म्हणून ओळखले जाते. रामाचे हे गुण अंगीकारून तुम्ही देखील तुमच्या जीवनात शुभ काळ आणू शकता.
प्रभू रामाचे 7 गुण जे जीवनात आत्मसात केले पाहिजेत
1. धैर्यवान श्री राम
प्रभू श्री रामाच्या अंगामध्ये सर्वात मोठा गुण सहनशीलता हा होता. कोणतीही गोष्ट सहनशीलतेने केल्यास ती सध्या होण्यास कोणतीही अडचण निर्माण होत नाही. मात्र तुम्ही जलद गतीने ते काम करण्यास गेल्यानंतर तुमचे काम बिघडू शकते. सहनशीलता तुम्हाला जीवनात यशस्वी बनवेल.
2. दयाळूपणा
श्री रामामध्ये दयाळूपणा हा एक मोठा गुण होता. त्यांच्या मनात मानव आणि प्राण्यांबद्दल दयेची भावना होती. सर्वांच्या मनात दयाळूपणाची भावना असली पाहिजे.
3. नेतृत्व क्षमता
प्रभू राम यांच्याकडे कुशल नेतृत्व होते. तसेच निर्णयक्षमता देखील सर्वोत्तम होती. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्या असल्याने ते सर्वोत्तम राजा होते. त्यांच्या या गुणामुळे समुद्रात दगडांनी पूल बांधणे शक्य झाले होते.
4. आदर्श भाऊ
आजकाल बहीण-भावामध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र प्रभू श्री रामासारखे भावा-बहिणींमध्ये परस्पर प्रेम असावे हे शिकण्यासारखे आहे.
5. मैत्रीची गुणवत्ता
केवत, सुग्रीव, निषादराज आणि विभीषण हे प्रभू श्री रामचे मित्र होते. श्री रामाच्या मैत्रीतून काहीतरी शिकणे आवश्यक आहे. मैत्री टिकवण्यासाठी प्रभू रामाने स्वतः अनेक संकटांचा सामना केला.
6. खंबीर हिंमत
प्रभू श्री रामामध्ये खंबीर हिम्मत हा देखील गुण होता. ज्या व्यक्तीमध्ये खंबीर हिंमत असते तो आयुष्यात नेहमी सफल होतो.
7. सद्गुणी
व्यक्तीने सर्व गुण संपन्न असणे आवश्यक आहे अनेकदा म्हंटले जाते. श्री राम हे सद्गुणी होते. त्यामुळे रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हंटले जाते. तुमची वागणूक आणि आचरण तुम्हाला योग्य दिशा दाखवत असते.