Suryoday Solar Scheme:- अयोध्यातील राम मंदिरात भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा प्रामुख्याने भारतवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
याकरिता केंद्र सरकारने सुमारे एक कोटी घरांच्या छतावर रूफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची घोषणा केली आहे. याकरिता प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एक कोटी लोकांच्या घरांच्या छतावर बसवण्यात येणार सोलर रूफ टॉप
अयोध्यातील कार्यक्रम आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवाशीयांच्या हिताचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला व तो म्हणजे देशातील एक कोटी नागरिकांच्या घरांच्या छतावर रुप टॉप सोलर बसवण्याचा व या बाबतीत नरेंद्र मोदींनी अधिकृत ट्विटर अकाउंट वर दिलेल्या माहितीनुसार,
जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामांच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्यातील अभिषेक प्रसंगी भारतीयांच्या घराच्या छतावर स्वतःची सौर रूप टॉप यंत्रणा असावी या प्रकारचा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे. आयोध्यातून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे आमचे सरकार एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय यांचे विज बिल तर कमी होईलच परंतु ऊर्जा क्षेत्रात देखील भारत स्वावलंबी होण्यास मदत होईल.
कसे राहिल या योजनेचे स्वरूप?
रूप-टॉप सोलर योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या अंतर्गत देशातील गरीब जनतेला विजेच्या वाढत्या किमतींपासून मुक्त करण्यात मदत होणार आहे. सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील कुटुंबांच्या घरांच्या छतावर रूप टॉप सोलर म्हणजे सौर यंत्रणा बसवणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल.
काय असेल या योजनेसाठीची पात्रता?
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 ही देशातील फक्त त्या लोकांना मिळणार आहे ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असेल. म्हणजे साधारणपणे देशातील गरिब आणि मध्यमवर्गीय लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कसा कराल या योजनेसाठी अर्ज?
जर तुम्हाला देखील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 अंतर्गत तुमच्या घराच्या छतावर रूप टॉप सोलर बसायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला नॅशनल पोर्टल फॉर रूफ टॉप सोलरच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटच्या रूप-टॉप सोलर पर्यायावर क्लिक करावे लागेल व त्यानंतर लॉगिन करणे गरजेचे राहील. यानंतर तुम्हाला याकरिता अर्ज करता येईल.