ACE DI 7500 4WD Tractor: 75 एचपीचे आहे ‘हे’ शक्तिशाली ट्रॅक्टर! 2 टनांपेक्षा वजन उचलण्याची आहे क्षमता

Ajay Patil
Published:
ace tractor

ACE DI 7500 4WD Tractor:- भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून त्यामध्ये Ace ही कंपनी देखील शेतकऱ्यांच्या गरजा आणि प्राधान्यानुसार परवडणाऱ्या किमतींमध्ये अनेक पावरफुल ट्रॅक्टर तयार करण्यासाठी ओळखले जाते. कोणत्याही प्रकारच्या शेतीमध्ये त्या कंपनीचे ट्रॅक्टर उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात.

या कंपनीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करता येणे शक्य आहे. Ace कंपनीचे ट्रॅक्टर हे उच्च इंधन कार्यक्षमतेसह पावरफुल इंजिनसह येतात. तसेच कमीत कमी इंधनाचा वापरावर ते चांगले कामगिरीसाठी ओळखले जातात. जर तुम्ही देखील शेती कामासाठी एखाद्या पावरफुल ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या करिता Ace di 7500 4WD ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आपण या लेखात बघू.

 काय आहेत ACE DI 7500 4WD ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?

या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 4088 सीसी क्षमतेसह चार सिलेंडर मध्ये टर्बोचार्ज केलेले इंजिन देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ते 75 एचपी पावरसह 305 एनएम टॉर्क जनरेट करते.

ट्रॅक्टरमध्ये क्लोगिंग सेन्सर प्रकारचे एअर फिल्टर असलेले ड्राय एअर क्लिनर देण्यात आले असून या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पॉवर 64 एचपी इतकी आहे. तसेच या ट्रॅक्टरची इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते. तसेच या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता ही 2200 किलोग्राम इतकी ठेवण्यात आलेली आहे. या ट्रॅक्टरचे वजन 2841 किलो आहे.

 या ट्रॅक्टरची इतर काही महत्त्वाची वैशिष्ट्ये?

यासोबतच या ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टेरिंग देण्यात आली असून तुम्हाला बारा फॉरवर्ड व बारा रिव्हर्स गिअरसह एक गिअर बॉक्स देण्यात आला आहे. तसेच या कंपनीला 31.25 किलोमीटर प्रतितास फॉरवर्ड वेग देण्यात आला असून या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल क्लच असून तो सिंक्रो शटल प्रकारच्या ट्रान्समिशनसह येतो. कंपनीने या ट्रॅक्टरला 65 लिटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे व ऑइल ईमेरस्ड डीस्क ब्रेक आहेत.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

Ace di 7500 4WD ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत बारा लाख 35 हजार रुपये ठेवण्यात आली असून या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेल्या रोड टॅक्समुळे बदलू शकते व तसेच या ट्रॅक्टरसह दोन वर्षाची वारंटी देखील देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe