अकोले :- बांधावरील झाड तोडल्याने थेट एका शेतक-याचा खून करण्याचा प्रकार घडल्याने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बांध हा विषयी सर्वत्र किती वादग्रस्त आहे या प्रकारातून पुन्हा एकदा समोर आले आहे.

अकोले तालुक्यातील रुम्हणवाडी येथील शेतकरी निवृत्ती तुकाराम सूर्यवंशी, वय ४८. यांचा लाकडी दांड्याने मारुन खून करण्याचा खळबळजनक प्रकार काल १०: ३० रोजी घडला आहे.

याप्रकरणी मयताचे भाऊ कचरु तुकाराम सूर्यवंशी, वय ३२, धंदा नोकरी, रा. सांगवी, हल्ली रा. कारखाना रोड, कारवाडी, अकोले यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन
खून करणारे आरोपी बाबुराव रघुनाथ सूर्यवंशी, गोपाळा रघुनाथ सूर्यवंशी, दोघे रा. सांगवी, ता. अकोले यांच्याविरुद्ध गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊ निवृत्ती तुकाराम सूर्यवंशी, रा. परदेशवाडी, केळी रुम्हणवाडी यांनी आरोपीच्या सामाईक बांधावरील सागाचे झाड तोडले.
या कारणावरुन आरोपी बाबुराव रघुनाथ सूर्यवंशी, गोपाळ रघुनाथ सूर्यवंशी या दोघा भावांनी संगनमत करुन
निवृत्ती सूर्यवंशी यांच्या घरी जावून त्यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. नळ्या फोडल्या. त्यात भाऊ निवृत्ती सूर्यवंशी हे ठार झाले,
घटनेची खबर मिळताच डिवायएसपी थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. पोसई काळे हे पुढील तपास करीत आहेत.
- मंत्रिमंडळ बैठकीसाठी चोंडीमध्ये प्रशासनाकडून जय्यत तयारी, तीन दिवसांत १५० कोटी खर्च करून भव्य शामियाना, ग्रीन रुम्स, स्टेजसह इतर सुविधा उभा करणार
- अक्षय तृतीयाला तयार होतोय नवा राजयोग ! 30 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !
- अहिल्यानगर : मंत्रिमंडळ बैठकीतील मंत्र्याच्या जेवणासाठी खास नगरी बेत, शिंगोरी आमटी, शेंगुळे, वांग्याचं भरीत, ठेचा-भाकरीचा असणार मेन्यू
- Ahilyanagar Railway : अहिल्यानगर जिल्ह्यात होणार 3238 कोटींचा नवा रेल्वेमार्ग, 85 किमी लांबी, 10 स्थानके आणि ‘या’ धार्मिक स्थळांना जोडले जाणार
- सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, सोने १ लाख रूपयांच्या उंबरठ्यावर! खरेदीसाठी नागरिकांची गर्दी !