शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानात नोकरीची संधी, रिक्त पदांवर भरती सुरू

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. शिर्डी हे देवस्थान देशातील कानाकोपऱ्यापर्यंत प्रसिद्ध आहे. या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अंतर्गत नोकरीची संधी चालून आली आहे. काही रिक्त पदांवर भरती होणार आहे.

यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक असून या पदांसाठी २७ हजार ४०० रुपये पगार असणार आहे. कोणत्या पदांवर भरती होणार आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अंतर्गत ‘पुजारी’ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. यात एकूण पदांची संख्या 11 आहे.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हटलं तर उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तो कोणत्याही मान्यताप्राप्त वेदपाठशाळेचा किमान पाच वर्षाचा पुजारी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे देखील आवश्यक आहे.

आणखी एक पात्रता म्हणजे उमेदवाराला 3 वर्षाचा पूजाविधीचा अनुभव गरजेचा आहे. ज्याला अर्ज करावयाचा आहे त्याचे वय 38 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. यासाठी कसलीही शुल्क किंवा फी असणार नाही.

किती असेल वेतन?

सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारास 27,400 रुपये पगार असणार आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अर्ज त्या थिजकानी पोहोचला पाहिजे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता.राहाता, जि. अहमदनगर – 423109 या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवून द्यायचा आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असेल तर अर्ज होईल, अर्जासोबत संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आदी गोष्टी उमेदवारांनी लक्षात घ्याव्यात. त्यामुळे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे व वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण असतील तर अशा उमेदवारांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे. यासाठी लवकरात लवकर अर्ज करून त्यादृष्टीने तयारी केली पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe