पारनेर :- तालुक्यातील डोंगरवाडी काटकवेड येथे राहणारे जनार्दन डोंगरे व त्यांच्या पत्नी सो, सीताबाई जनार्दन डोंगरे या वृद्ध दाम्पत्याकडे काल दुपारी ३. १५ च्या सुमारास भरदिवसा चार अनोळखी चोरटे घरी आले व त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करुन पाणी मागत घरात घुसले.
चौघा आरोपींनी वृद्ध सीताबाई जनार्दन डोंगरे, वय ७० व त्यांचे पती जनार्दन डोंगरे या दोघांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापड़ी बोळे कोंबले, चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील व अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने लुटून नेले.
आरडाओरड करू नये म्हणून चाकू लावून धक्काबुक्की केली. व चारही चोरटे दागिने लुटून निघून गेले. याप्रकरणी सीताबाई जनार्दन – डोंगरे या वृद्ध महिलेने पारनेर पोलिसांत फिर्याद दिल्या वरुन अज्ञ।त चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक कलवानिया यांनी भेट दिली. पोसई भुजबळ हे पुढील तपास करीत आहेत, ७५ हजाराचे दागिने चोरट्यांनी लुटून नेले. पाणी देणेही आता धोक्याचे ठरत आहे.