ESIC Mumbai Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत “ज्येष्ठ निवासी, अर्धवेळ / पूर्णवेळ विशेषज्ञ, अर्धवेळ / पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 29 आणि 30 जानेवारी 2024 हजर राहायचे आहे.
![ESIC Mumbai Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-ESIC-Mumbai-Bharti-2024.jpg)
वरील भरतीसाठी शिक्षण पदांनुसार आवश्यक असेल, मुलाखतीसाठी उमेदवारांनी प्रशासकीय ब्लॉक, 5 वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल, भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल कांदिवली परिसर, आकुर्ली रोड, ठाकूर घराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
वरील भरतीसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे ते ६९ वर्षे आहे, यापुढील उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहू नये. भरती संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-मुलाखतीची तारीख 29 आणि 30 जानेवारी 2024 आहे.
-वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
आवश्यक कागदपत्रे
-वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र.
-शैक्षणिक पात्रतेचा पुरावा.
-MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे.
-इंटर्नशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र.
-नवीनतम कास्ट प्रमाणपत्र/नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र/EWS प्रमाणपत्र.
-अनुभव प्रमाणपत्रे, एनओसी पत्र, नियोक्त्याचे रिलिव्हिंग लेटर जर आधीच नोकरीला असेल तर.