Safest Car Price Hike : चिंताजनक ! देशातील ‘ही’ सर्वात सुरक्षित कार झाली महाग, नवीन प्राइस लिस्ट पहा

Ahmednagarlive24 office
Published:

Safest Car Price Hike : कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. खरेतर या नवीन वर्षात अनेकांना नवीन कार खरेदी करायची आहे. यासाठी कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी पैशांची जमवाजमव सुरू केली आहे.

अशातच मात्र नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एका लोकप्रिय कार निर्मात्या कंपनीने आपल्या बेस्ट सेलिंग कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्कोडा कंपनीने आपल्या सर्वात सुरक्षित कारची किंमत वाढवली आहे.

कंपनीने स्लाविया या गाडीची किंमत वाढवली आहे. म्हणजेच आता या कारची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. मात्र या गाडीच्या सर्वच व्हेरिएंटची किंमत वाढवण्यात आलेली नाही.

कंपनीने काही मोजक्या व्हेरिएंटची किंमत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काही व्हेरिएंटची किंमत 5.91% पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे वाढत्या महागाईने बेजार झालेल्यांना आता ही कार खरेदी करणे देखील महाग होणार आहे.

या कारच्या बेस व्हेरिएंटची किमतीत सर्वाधिक वाढ नमूद करण्यात आली आहे. आधी या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.89 लाख रुपये एवढी होती. आता मात्र या व्हेरिएंटची किंमत 11.53 लाख रुपये एक्स शोरूम एवढी झाली आहे.

म्हणजेच या गाडीची किंमत 64,400 रुपयांनी वाढवली गेली आहे. वास्तविक, कंपनीने नोव्हेंबरमध्ये त्याची किंमत 50,000 रुपयांनी कमी केली होती. पण आता 64 हजारापेक्षा जास्तीने या मॉडेलची किंमत वाढवण्यात आली असल्याने ही कार खरेदी करण्यासाठी आता अधिकचा खिसा रिकामा करावा लागणार आहे.

स्लाविया एक लिटर टर्बो पेट्रोलच्या कारची नवीन प्राईस लिस्ट

ऍक्टिव्ह एमटी मॉडेल साठी आता 11 लाख 53 हजार 400 रुपये मोजावे लागणार आहेत. Ambition MT या मॉडेलसाठी 13 लाख 43 हजार 400 रुपये मोजावे लागणार आहेत. स्टाईल एमटी या मॉडेलसाठी आता 15 लाख 63 हजार 400 रुपये खर्च करावे लागणार आहेत. Ambition AMT या मॉडेल साठी 14 लाख 73 हजार 400 रुपये खर्च करावे लागणार आहेत. स्टाईल एएमटी या कारची किंमत 16 लाख 93 हजार 400 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

स्लाविया 1.5 लिटर टर्बो पेट्रोलच्या कारची नवीन प्राईस लिस्ट

Ambition MT साठी आता 15 लाख 23 हजार चारशे रुपये एवढी किंमत आकारली जाणार आहे. Style MT साठी 17 लाख 43 हजार 400 रुपये एवढी किंमत आकारली जाणार आहे. Ambition AMT ची 16 लाख 63,400 एवढी किंमत राहणार आहे. Style AMT ची 18 लाख 83 हजार 400 एवढी नवीन किंमत राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe