Electric Luna : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजार आता मोठा वाढला आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचे मार्केट दिवसेंदिवस ग्रो करत असल्याने आता देशातील अनेक दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट मध्ये नवनवीन गाड्या लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
कायनेटिक ग्रीन ही कंपनी लवकरच इलेक्ट्रिक लूना लॉन्च करणार असे वृत्त समोर आले आहे. इलेक्ट्रिक लूना मोपेड सात फेब्रुवारी 2024 ला लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे या गाडीसाठीची बुकिंग आधीपासूनच सुरू झाली आहे. 26 जानेवारी 2024 पासून या गाडीची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बुकिंग फक्त पाचशे रुपयात सुरू करण्यात आली आहे.
जर तुम्हालाही इलेक्ट्रिक मोपेड खरेदी करायची असेल तर तुम्ही मात्र 500 रुपयात या गाडीची बुकिंग करू शकणार आहात. मात्र या गाडीचे फीचर्स काय राहणार याबाबत अजूनही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण, या गाडीचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास एवढा राहू शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जात आहे.
तसेच ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 110 किलोमीटर पर्यंत धावणार असे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या गाडीबाबतची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहू शकतात फिचर्स
मीडिया रिपोर्ट नुसार, या सात फेब्रुवारीला लॉंच होणाऱ्या इलेक्ट्रिक कायनेटिक लुना मोपेडमध्ये 2kWh लिथियम आयन बॅटरी वापरलेली राहणार आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तासाचा कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे चार तास चार्जिंग केल्यानंतर ही गाडी 110 किलोमीटर पर्यंत धावणार आहे.
तसेच या गाडीचे इंजिन 22Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यासं सक्षम राहणार आहे. या गाडीमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, साइड स्टँड कटऑफ स्विच, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिटेचेबल रीअर सीट आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम यांसारखे फीचर्स राहणार असा दावा केला जात आहे.
ही नव्याने भारतीय बाजारात दाखल होणारी इलेक्ट्रिक मोपेड मलबेरी रोज आणि ओशन ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
किंमत किती राहणार ?
या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीची किंमत किती राहणार हे अजूनही कळू शकलेले नाही. कंपनीने अधिकृतरित्या या गाडीची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या गाडीची किंमत 70 हजार रुपये एवढी राहण्याची शक्यता आहे.
70,000 रुपयाच्या एक्स शोरूम किमतीत ही गाडी उपलब्ध होणार आहे. अर्थातच या गाडीची ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. यामुळे आता या गाडीची किंमत किती राहणार, या गाडीचे फीचर्स काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.