अहमदनगर :- पाथर्डी तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमात खा.. सुजय विखे यांच्यासमोरच काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकार्यांच राडा झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज माजी आमदार स्व. दगडू पाटील बडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात तु काँग्रेसचा आहे भाजपचे खासदार यांच्या पुढे पुढे का करतो असे म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या कानाखाली लावली,


खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोरच काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिका – यांचा राडा झाला. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद कार्यकर्त्यांनी मध्यस्थ करत सोडला.
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगूळ येथे माजी आमदार स्व . दगडू पाटील बड़े यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम होता या कार्यक्रमाला भाजपचे खा डॉ सुजय विखे. आ, मोनिका राजळे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम पार पडल्यानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे हे खा. सुजय विखे यांच्या जवळ गेले. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी राहुल कारखिले यांनी रक्ताटे यांना तु काँग्रेसचे आहे. भाजपचे खासदार यांच्याकडे काय करतो असे म्हणून कारखिले यांनी रक्ताटे यांच्या कानाखाली लावली.

खा. विखे यांच्यासमोरच हा राडा झाला. कांग्रेस अणि भाजपच्या पदाधिका-यामध्ये झालेल्या तंट्यानंतर खा. विखे यांनी आता असे वाद होणारच असून कार्यकत्यांना समजून सांगावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- ‘या’ 4 राशींना मिळतो देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद! घरात कधीच भासत नाही पैशांची कमी
- नवीन QR कोडमुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित!पण जुनं कार्ड अजून वापरता येईल का?, जाणून घ्या
- आयुष्य बर्बाद करू शकतात ‘ही’ 4 लोकं, चाणक्यांनी दिला वेळीच ओळखण्याचा सल्ला!
- फक्त पर्यटन नाही, थायलंड ‘या’ 7 क्षेत्रांतूनही करतो अब्जावधींची कमाई! भारतालाही टाकलं मागे
- Gardening Tips: टेरेस गार्डनवरील रोपं उन्हामुळे सुकलीत?, मग तज्ञांनी सांगितलेल्या 5 टिप्स नक्की वापरुन बघा!