Tata Curvv : कार खरेदी करणाऱ्यांसाठी विशेषता टाटाची कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला टाटा कंपनीची डिझेल कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन बाजारात येणार आहे.
विशेष म्हणजे 2024 या वर्षातच हे नवीन मॉडेल बाजारात दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून सूरु होणाऱ्या भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये टाटा कंपनी टाटा कर्व एसयुव्हीचे डिझेल मॉडेल सादर करणार आहे.
खरंतर आतापर्यंत बाजारात टाटा कर्व डिझेलमध्ये देखील बाजारात लॉन्च होणार अशा चर्चा होत्या. मात्र आता कंपनीने अधिकृतरित्या याची पुष्टी केली आहे. यामुळे या वर्षात टाटा कर्व इलेक्ट्रिक सोबतच टाटा कर्व डिझेल आणि पेट्रोल देखील बाजारात लॉन्च होणार हे जवळपास नक्की झाले आहे. अशा परिस्थितीत आता आपण टाटा कर्व डिझेल मॉडेलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डिझेल कारचे इंजिन कसे राहणार ?
मिळालेल्या माहितीनुसार या गाडीचे इंजिन टाटा नेक्सॉन प्रमाणे राहणार आहे. म्हणजे या गाडीत 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळणार आहे. हे इंजिन 113bhp आणि 260Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम राहणार असा दावा केला जातोय. हे इंजिन केवळ 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडले जाईल. तथापि, Curvv हे प्रीमियम उत्पादन असल्याने, टाटा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देणार असा अंदाज आहे.
कसे राहणार डिझाईन
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीची ही नव्याने लॉन्च होणारी गाडी Curvv च्या फ्रंटला उभ्या LED हेडलॅम्प आणि Nexon सारखे कनेक्ट LED DRL दिले जाणार आहे. यात ग्रिल डिझाइनसह ग्रील बंद करण्यात आली आहे. साइड प्रोफाइलला स्पोर्टी अलॉय व्हील्स आणि फ्लश डोअर हँडल दिले जाणार आहेत.
या SUV ला स्लोपिंग रूफलाईन देण्यात आली आहे. या कारच्या मागील बाजूस LED टेल लॅम्प आणि एक स्पोर्टियर रियर स्पॉयलर देण्यात आले आहे. एकंदरीत, कूप डिझाईनसह Curvv स्टायलिश, स्पोर्टी आणि खूपच अट्रॅक्टिव भासत आहे. यामुळे ग्राहकांना ही गाडी आवडेल अशी आशा आहे. कंपनीने देखील ही गाडी ग्राहकांमध्ये लवकरच लोकप्रिय होण्याची आशा आहे.
केव्हा लाँच होणार ?
मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीच्या माध्यमातून आधी कर्व इलेक्ट्रिक लॉन्च केली जाणार आहे. यानंतर कंपनी कर्व डिझेल आणि कर्व पेट्रोल मॉडेल लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही गाडी नेमकी केव्हा लॉन्च होणार याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत या गाडीची लॉन्चिंग होऊ शकते असे सांगितले जात आहे.