Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांचे स्वतःचे महत्त्व आहे. सर्व ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलत असतात. बुद्धिमत्ता, ज्ञान, गणित, हुशारी आणि व्यवसायाचा कारक बुध 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:29 वाजता धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. जो सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पाडेल.
मेष

मेष राशीच्या लोकांना बुधाच्या संक्रमणाचा फायदा होईल. या काळात यशाची दारे उघडतील. व्यवसायात लाभ होईल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. तुम्हाला पालकांचे सहकार्य मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगले भाग्य आणेल. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. करिअर आणि बिझनेस संदर्भात चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. मुलांकडून आनंद मिळू शकेल.
कन्या
कन्या राशीवर बुधचा विशेष आशीर्वाद राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. लव्ह लाईफ चांगले राहील आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील. घरातील ज्येष्ठांशी संबंध चांगले राहतील, यश मिळण्याची शक्यता आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांना या संक्रमणाचा फायदा होईल. उत्पन्न वाढेल. भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळेल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण वरदानापेक्षा कमी नाही. नवीन काम सुरू करताना फायदा होईल. परदेशात जाऊन नोकरी करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. ऊर्जा वाढेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठीही हे संक्रमण उत्तम राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांकडून आनंद मिळू शकेल.
‘या’ राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज असेल !
काही राशींसाठी, मकर राशीत बुधाचे संक्रमण उत्तम नसेल, जीवनात चढ-उतार येतील. मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. कर्क राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते, कोणालाही उधार देणे टाळा. सिंह राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. खर्च वाढू शकतो. तूळ राशीच्या लोकांनी आपल्या पालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कुंभ राशीच्या लोकांनी कर्ज देणे टाळावे. आर्थिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून वाईट बातमी मिळू शकते.