पुणतांबा-रोटेगाव रेल्वे मार्गासाठी संघर्ष तीव्र करणार

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : पुणतांबा-रोटेगाव हा २६ कि. मी. चा रेल्वे मार्ग खर्चाच्या दृष्टीने कसा योग्य आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्रालयाच्या वरीष्ठ आधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी

शिष्टमडाळासह त्यांची भेट घेणार असून वेळ पडल्यास त्यासाठी तीव्र संघर्ष करणार असल्याचे ग्रामस्थ व पुणतांबा परिसर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सांगण्यात आले.

ब्रिटीश काळापासून पुणतांबा- रोटेगाव रेल्वे मार्ग होणार, अशी चर्चा वैजापूर तालुक्यासह पुणतांबा परिसरात आहे, १९४७ला भारत स्वातंत्र झाला आणि ब्रिटिशांनी हाती घेतलेले अनेक प्रकल्प मागे पडले; परंतु जनतेच्या चर्चेत व स्मरणात आजही कायम राहिले,

कारण पुणतांबा- रोटेगाव रेल्वे मार्गाचे रेल्वेच्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अचूक सव्र्व्हेक्षण करूण कमी खर्चात कुठेही मोठापुल नाही आशा प्रकारचा मार्ग करणे प्रशासकीय खर्चाच्या दृष्टीने योग्य आहे, असे आजही अनुभवी व जानकर नागरिक सांगतांत.

या भागाचे लोकसभेत कायम प्रतिनिधित्व करणारे त्या वेळचे खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनीही पुणतांबा- रोटेगाव मार्गाचा कायम पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने अनेक वेळा अर्थसंकल्पात तरतूद केली,

तसेच सव्र्व्हेक्षण करून योग्य अहवाल सादर केले, तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार कै. सुर्यभानजी वहाडणे यांनीही हा रेल्वे मार्ग होणे कसा योग्य आहे,

हे रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देवून पाठपुरावा केला होता; परंतू राजकीय स्थित्यंतरात या मार्गाला बगल देण्यात आली.

दक्षिण भारतातून शिर्डीकरिता येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या प्रवाशांना औरंगाबादमार्गे दौलाताचाद पोटुळ लासूर-करंजगाव -परसोडा तारूर- नगरसूल-अंकाई -मनमाड परत अंकाई- येवला- कोपरगाव- कन्हेगाव- पुणतांबा (जंक्शन) शिर्डी असा मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे भाविक व प्रवाशांना आर्थिक फटका बसून वेळही जादा लागतो. सैन्यदलासाठीही हा लांबचा मार्ग आहे.

याला पर्याय कसा देता येईल, याचा विचार ब्रिटिश काळापासून आजपर्यंत सुरू आहे. पुणतांबा रोटेगाव रेल्वे मार्गाचा प्रश्न महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयन करणार असल्याचे नागरिक सांगतात. पुणतांचा परिसर प्रवासी संस्था गेल्या दोन दशकांपासून या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहे.

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ व बेलापूर रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्य बन्सीलाल दौलतराम फेरवाणी यांनी यासाठी पाठिंबा दिला आहे.

■ पुणतांबा – रोटेगाव रेल्वे मार्ग पुढील पिढीच्या विकासाकरिता व साईभक्तांच्या सोयीसाठी होणे गरजेचे आहे. कारण शिर्डी- सिन्नर- नाशिक असा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. म्हणून पुणतांबा रोटेगाव हा जवळचा मार्ग झाल्यास दक्षिण भारतातील साईभक्त थेट साईनगर शिर्डी- मुंबई कमी वेळात प्रवास करतील. पुणतांबा – शिर्डी- नाशिक त्र्यंबकेश्वर ही तीन धार्मिक स्थळे जोडली जातील. – राजेंद्र थोरात, गणेशचे माजी संचालक

■ पुणतांबा – रोटेगाव हा रेल्वे मार्ग प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने योग्य मार्ग आहे, तसेच बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होऊन वैजापूर तालुक्यासह, पुणतांबा परिसराच्यां विकासासाठी चालना मिळेल. – सुनिल कुलट

■ पुणतांबा – रोटेगाव रेल्वे मार्गाजवळून समृध्दी महामार्ग जातो. बाबतरा- लाख- पुरणगाव- धोत्रे यासह इतर गावांच्या जवळ स्मार्ट सिटी हा दूसरा मोठा प्रकल्प होणार आहे. यासाठी हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे.-केशव मोरे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe