Ahmednagar Crime : कुरिअर फ्रेंचाइजी देण्याच्या नावाखाली युवकाची साडेतीन लाखांची फसवणूक

अहमदनगर मध्ये कुरिअर कंपनीची फ्रेंचाइजी देण्याच्या ३ लाख ४६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तोतया अधिकाऱ्यावर भिंगार ‘कम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रवीण गारदे (रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना जानेवारीत एका मोबाईल वर फोन करून आपण नामांकित कुरिअर कंपनीत अधिकारी आहे. या कंपनीची फ्रेंचाइजी भिंगार मध्ये द्यायची असल्याचे त्याने सांगितले.

त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून गारे यांनी याबाबत उत्सुकता दाखविली. त्यानंतर त्या तोतयाने गारदे यांचा विश्‍वास पटण्यासाठी त्यांच्या कडून कागदपत्रे व ऑनलाईन पैसे मागवून घेतले.

३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत गारे यांनी त्याला सुमारे ३ लाख ४६ हजार रुपये ऑनलाईन पाठविले. मात्र त्यानंतर त्याने गारदे यांचे फोन घेण्यास टाळाटाळ सुरु केली. पाठपुरावा करूनही कुरिअर कंपनीची फ्रेंचाइजी मिळाली नाही.