संगमनेर | मालट्रकची धडक बसून दुचाकीस्वाराचा संगमनेर खुर्द येथे मृत्यू झाला. हारुन शेखलाल बागवान (वय ३७, संगमनेर खुर्द) असे मृताचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. रमजान ईदच्या आदल्या दिवशी झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्याकडून संगमनेरकडे भरधाव येत असलेली महिंद्रा लॉजिस्टीक कंपनीच्या मालट्रकची (एनएल ०१ एल १७३५) समाेरून येणाऱ्या दुचाकीस (एमएच १७ बीसी ६४८८) धडक बसली.
अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मालट्रक ताब्यात घेतला.
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘
- सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त
- 1 लाखपेक्षा जास्त किंमत असलेली टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 86 हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी! या ठिकाणी मिळेल भन्नाट डील
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू