Maharashtra News : औद्योगिक विकासासह विविध गोष्टींना चालना देण्यासाठी विविध महामार्गांचे काम सध्या शासनाकडून सुरु आहे.
यामध्ये नाशिक-अहमदनगर- पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा देखील समावेश आहे. हा १८० किलोमीटर लांबीचा महामार्ग असणार असून याची उभारणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
त्या महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. आज घडीला नाशिक – अहमदनगर- पुणे असे जाण्यास पाच तास लागतात.
हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे-नाशिक अंतर दोन ते अडिच तासांत पार करणे शक्य होणार आहे. तसेच या महामार्गाचा संगमनेर, शिर्डीसह नगर जिल्ह्यालाही लाभ होणार आहे.
पुणे ते नाशिकदरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्गिकेची उभारणी देखील होणार असून ते रेल्वेकडून होणार आहे.
एमएसआरडीसीचे याच मार्गाला समांतर औद्योगिक द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्याचे नियोजन सध्या सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. हा महामार्ग पुणे, नाशिक, अहमदनगर असे तीन जिल्हे जोडील.
प्रस्तावित महामार्गाची रेषा राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्वाच्या शहराजवळून प्रस्तावित आहे.
सुरत ते चेन्नई महामार्गास जोडणीमुळे सुरतचा प्रवासही वेगवान होणार आहे. तसेच शिर्डीलाही हा मार्ग जोडण्यात येणार असल्याने देशभरातील साईभक्तांना त्याचा लाभ होईल.
दरम्यान या महामार्गामुळे पुणे-नाशिक हा प्रवास सद्यस्थितीला ५ तासावरून साधरणपणे २ ते अडिच तासावर येईल.
दळवळण गतीमान झाल्यास पुणे-नगर-नाशिक जिल्ह्यातील लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी विषयक संस्थांना याच लाभ होणार आहे.
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा भाग पुणे ते शिर्डी, शिर्डी इंटरचेन्ज ते नाशिक निफाड इंटरचेन्ज (सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग), सुरत चेन्नई ट्रेतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक निफाड राज्य मार्गाचा भाग) याभागानुसार अंतिम आखणी महामंडळाने प्रस्तावित केली आहे. तसेच भोसरी, रांजणगाव, शिर्डी जोडरस्ते यास मान्यता दिली आहे.