जामखेड :- नान्नज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून सहा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
अमजद निजाम पठाण याच्या घरात गोवा – १००० गुटख्याचा साठा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषणने जप्त केला. या गुटख्याची किंमत सहा लाख दहा हजार रुपये आहे.
कारवाईची चाहूल लागल्याने आरोपी अमजद पठाण फरार झाला. पठाण हा राष्ट्रवादी मुस्लिम सेवा संघाचा प्रवक्ता आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक औताडे यांना खबऱ्याकडून नान्नज येथील अमजद पठाण याच्या घरात चोरीचा माल असल्याची माहिती मिळाली होती.
त्या आधारे गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तेथे छापा टाकून झडती घेतली असता घरात लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा सापडला. जप्त केलेला गुटखा जामखेड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
- मराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणीवर
- महाकुंभात भीषण चेंगराचेंगरी :ब्रह्म मुहूर्तावर अमृत स्नानाची पर्वणी साधण्याच्या नादात अनेकांनी गमावला जीव
- आतापर्यंत राज्यात इतके बांगलादेशी घुसखोर सापडले : राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर
- फक्त आधार कार्ड दाखवा अन 80 हजारापर्यंतचे कर्ज मिळवा ! सरकारची ‘ही’ योजना ठरली गेमचेंजर
- आता राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांवर रूफटॉप सोलर प्रकल्प बसवणार; आतापर्यंत इतक्या हजार शासकीय इमारतींवर प्रकल्प कार्यान्वित