BOM Personal Loan:- अचानकपणे आर्थिक गरजा उद्धवल्यामुळे त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक तितका पैसा आपल्याकडे असतोच असे नाही. त्यामुळे अशा गरजा भागवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला बँका किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेणे गरजेचे ठरते किंवा मित्र आणि नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे घेणे क्रमप्राप्त ठरते.
यामध्ये बरेच जण बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक अर्थात पर्सनल लोनसाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. अनेक बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनची सुविधा दिली जाते व व्याजदरापासून तर वैशिष्ट्यांपर्यंत बँका निहाय वेगवेगळे वैशिष्ट्य असतात.

अगदी याच पद्धतीने जर आपण बँक ऑफ महाराष्ट्राचा विचार केला तर आर्थिक गरजेच्या वेळी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून पर्सनल लोन घेऊ शकतात. या अनुषंगाने आपण या लेखात बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पर्सनल लोनविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्र देते दहा लाख रुपये पर्सनल लोन
इतर बँकांप्रमाणेच तुमच्या आर्थिक गरजेच्या वेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून देखील आकर्षक व्याजदरांमध्ये पर्सनल लोन ऑफर करण्यात आलेले आहे. हे पर्सनल लोन तुम्हाला परतफेड करण्यासाठी दीर्घ कालावधी देखील बँकेच्या माध्यमातून दिला जातो.
बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या या पर्सनल लोनचा व्याजदर पाहिला तर तो साधारणपणे 9.25% पासून सुरू होतो. जर तुम्हाला देखील बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून पर्सनल लोन घ्यायचे असेल व तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचे खातेधारक असाल व तुम्हाला मोठी रक्कम हवी आहे
तर तुम्ही कमीत कमी कागदपत्रांसह बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पर्सनल लोनकरीता अर्ज करू शकता. जास्तीत जास्त वीस लाख रुपये पर्सनल लोन तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
काय आहेत बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोनची वैशिष्ट्ये?
1- या पर्सनल लोनचे सगळ्यात महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे तुमची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही सहजतेने बँक ऑफ महाराष्ट्रातून वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात.
2- तसेच सर्वात कमी आणि आकर्षक व्याजदरात हे पर्सनल लोन देण्यात येते.
3- तसेच या पर्सनल लोनकरिता तुम्हाला अगदी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
4- बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला वीस लाख रुपये पर्यंत कर्जाची रक्कम मिळू शकते.
5- एवढेच नाही तर या कर्जावर तुम्हाला कुठल्याही प्रकारची छुपे शुल्क आकारले जात नाही.
6- तसेच तुमच्या कर्जाच्या रकमेवरील जे काही व्याजदर आहेत त्यावरील दररोज कमी होत असलेल्या शिलकीचा फायदा देखील मिळतो.
7- बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्र तसेच राज्य सरकार व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना 9.25% टक्के व्याजदराने गृह कर्ज देखील देते. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणे गरजेचे आहे व सिबिल स्कोर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असावा.
पर्सनल लोनसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
1- ओळखीचा पुरावा( कोणतेही एक कागदपत्र)- निवडणूक ओळखपत्र, पॅन किंवा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सध्या तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीला आहात त्या ठिकाणी असलेल्या मालकाकडील फोटोसह ओळखपत्र आणि पासपोर्ट
2- रहिवासी म्हणजेच निवासाचा पुरावा( कोणतेही एक)- इलेक्ट्रिसिटी बिल, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, विद्यमान मालकांनी जारी केलेले ओळखपत्र, पासपोर्ट
पगारदार व्यक्तींकरिता आवश्यक कागदपत्रे
अलीकडील गेल्या तीन महिन्याचे मूळ/ प्रमाणित पगारपत्रक, आयकर विभाग यांनी मंजूर केलेल्या गेल्या दोन वर्षातील आयटी रिटर्न/ आयटी असेसमेंट ऑर्डर्स किंवा मालकांकडून प्राप्त केलेल्या गेल्या दोन वर्षातील फॉर्म नंबर 16 च्या मूळ प्रमाणित प्रती,
जेव्हा आवश्यक असेल तेव्हा पगारातून कर्जाच्या मासिक हप्त्याची रक्कम कापून घेऊन ती जमा करण्याचे मालकांचे अभिवचन आणि बँक खाते स्टेटमेंट( पगार खात्याच) गेल्या सहा महिन्यांचे स्टेटमेंट( अन्य बँकेत खाते असेल तर त्याबाबतीत)
पगारदार व्यतिरिक्त वर्ग/ उद्योजक/ व्यावसायिक
गेल्या तीन वर्षाच्या आयटी रिटर्न( व्यवसायिक असल्यास दोन वर्षाचे), त्याचबरोबर उत्पन्नाचा तपशील, नफा तोटा पत्रक, ताळेबंद आणि लेखापरीक्षण अहवाल, शॉप ॲक्ट प्रमाणपत्र, कर नोंदणी प्रमाणपत्र, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र आणि गेल्या वर्षामधील बँकेचे स्टेटमेंट
इत्यादी कागदपत्रे लागतात व अधिक माहितीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रशी संपर्क साधणे फायद्याचे राहील.