Saving Account:- साधारणपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे बँकेमध्ये खाते असते. जर आपण बँकेच्या खात्यांचे प्रकार पाहिले तर यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे खाते हे उघडले जातात व त्यामध्ये एक बचत म्हणजे सेविंग अकाउंट आणि दुसरे म्हणजे करंट अर्थात चालू खाते या दोन खाते प्रकारांचा यामध्ये समावेश होतो.
जर आपण पगारदार व्यक्तींचा विचार केला तर अशा व्यक्तींचे साधारणपणे बँकेत बचत खाते आणि चालू खाते अशा दोन्ही प्रकारचे खाते असतात. परंतु यामध्ये जर पाहिले तर खात्यांच्या बाबतीत देखील बँकांचे काही नियम असून यातील मिनिमम बॅलन्सचा नियम म्हणजेच किमान शिल्लक बँक बचत खात्यात ठेवणे संबंधीचा नियम खूप महत्त्वपूर्ण असतो व तो ग्राहकांना पाळणे खूप गरजेचे असते.

त्यामध्ये प्रत्येक बँकेची मिनिमम बॅलन्स मर्यादा वेगवेगळी आहे व तेवढा बॅलन्स त्या खात्यामध्ये राहू देणे हे गरजेचे असते. बँकेच्या मर्यादेपेक्षा जर कमी बॅलन्स तुम्ही त्या खात्यावर ठेवला तर बँकेच्या माध्यमातून त्यावर दंड आकारला जाऊ शकतो.
परंतु जर तुमचे शून्य शिल्लक खाते या प्रकारात खाते असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता राहत नाही. तसे पाहायला गेले तर याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शक तत्वे नाहीत.
बँकांच्या माध्यमातून संबंधित खात्यांचे देखरेख आणि सर्विसिंग या करिता जो काही खर्च येतो तो विचारात घेऊन मिनिमम बॅलन्स ठेवायची आणि मिनिमम शिल्लक न ठेवल्यास विशिष्ट शुल्क आकारण्याचे ठरवले जात असते.
या अनुषंगाने आपल्याला माहित असणे गरजेचे आहे की कुठल्या बँकेच्या बचत खात्यात किती मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. त्याविषयीचीच माहिती या लेखात घेऊ.
कुठल्या बँकेच्या खात्यात किती ठेवावा लागतो मिनिमम बॅलन्स?
1- स्टेट बँक ऑफ इंडिया- जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सेविंग अकाउंट असेल तर याबाबत बँक बझारने दिलेल्या माहितीनुसार पाहिले तर मेट्रो आणि शहरी भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये बचत प्लस खाती
असलेल्या ग्राहकांसाठी तीन हजार रुपये मिनिमम बॅलन्स म्हणजेच किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. त्यासोबतच निमशहरी भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जर सेविंग अकाउंट असेल तर दोन हजार रुपये व ग्रामीण भागातील खातेधारकांसाठी एक हजार रुपये शिल्लक बचत खात्यात ठेवणे आवश्यक आहे.
2-एचडीएफसी बँक– एचडीएफसी बँकेचा विचार केला तर शहर आणि मेट्रो ठिकाणी बचत खाते असलेल्या ग्राहकांना दहा हजार तर ग्रामीण आणि निमशहरी बँक शाखा मध्ये जर बचत खाते असेल तर ग्रामीण भागाकरिता अडीच हजार तर निमशहरी ग्राहकांना पाच हजार रुपये मासिक शिल्लक ठेवणे गरजेचे आहे. ( किंवा यामध्ये किमान एक वर्ष आणि एक दिवसाच्या मुदत ठेवी)
3- येस बँक– जर एस बँकेमध्ये सेविंग अडवांटेज अकाउंट असेल तर अशा ग्राहकांसाठी दहा हजार रुपये मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवणे गरजेचे आहे. जर एखाद्या ग्राहकांच्या माध्यमातून किमान शिल्लक आवश्यकता ठेवली गेली नाही तर त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांपर्यंत नॉन मेंटेनन्स शुल्क आकारले जाते.
4- आयसीआयसीआय बँक- आयसीआयसीआय बँकेचा विचार केला तर मेट्रो आणि शहरी भागात असलेल्या बँकेच्या शाखांमध्ये नेहमी बचत खाते असतील तर सरासरी मासिक 10,000 शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.
निमशहरी आणि ग्रामीण भागातील बचत खाते असलेल्या ग्राहकांनी दरमहा अनुक्रमे 5000 आणि ग्रामीण भागाकरिता दोन हजार रुपये किमान शिल्लक ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय ग्रामीण भागेतील शाखेत नियमित बचत खाते असेल तर अशा ग्राहकांनी किमान 1000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
5- कोटक महिंद्रा बँक- जर तुमचे कोटक महिंद्रा बँकेचे एज सेविंग अकाउंट असेल तर अशा ग्राहकांनी मासिक किमान शिल्लक दहा हजार रुपये राखणे आवश्यक आहे. जर संबंधित ग्राहक यामध्ये असमर्थ राहिले तर बँक त्यांना पाचशे रुपये पर्यंत मासिक नॉन मेंटेनन्स चार्जेस आकारू शकते.
तसेच कोटक महिंद्रा बँकेने ऑफर केलेल्या कोटक 811 बचत खात्यात किमान शिल्लक आवश्यक नसून तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड माहितीसह कोटक महिंद्रा ८११ शिल्लक बचत खाते उघडू शकतात.