Personal Loan: कमी व्याजदरामध्ये पर्सनल लोनच्या शोधात आहात का? तर ‘या’ बँका देतात सर्वात कमी व्याजदरात पर्सनल लोन!

Published on -

Personal Loan:- जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते व तेव्हा आपल्याकडे तितका पैसा असतो असे नाही. त्यामुळे आपण बँकेकडून एखाद्या कर्जासाठी अर्ज करतो व यामध्ये बरेच जण वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनचा पर्याय निवडतात.

पर्सनल लोनच्या बाबतीत पाहिले तर प्रत्येक बँकेकडून ते दिले जात असते व प्रत्येक बँकेचे व्याजदर व इतर नियम याबाबतीत वेगवेगळे असतात. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतो तेव्हा आपण सगळ्यात अगोदर त्याचा व्याजदर पाहत असतो.

कारण त्याचा परिणाम हा आपल्या घेतलेल्या कर्ज परतफेडीवर होणारा असल्यामुळे  साहजिकच प्रत्येक जण हा कमीत कमी व्याजदरात आपल्याला पर्सनल लोन कुठल्या बँकेतून मिळेल याचा विचार प्रामुख्याने करत असतो.

त्यामुळे तुम्हाला देखील जर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर नेमके कोणत्या बँकेतून कमी व्याजदरात मिळेल हे तुम्हाला माहीत असणे देखील गरजेचे असते. त्यामुळे या लेखात आपण काही बँकांची यादी पाहणार आहोत जे परवडणाऱ्या दरामध्ये पर्सनल लोन ऑफर करतात.

 या बँका देतात कमीत कमी व्याजदरात पर्सनल लोन

1- युनियन बँक ऑफ इंडिया- या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना पाच वर्षांच्या कालावधी करिता एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते व यावर तुम्हाला साधारणपणे 9.3% ते 13.4% पर्यंत व्याजदर आकारला जातो.

यामध्ये तुम्हाला 2090 पासून 2296 रुपये पर्यंतचा ईएमआय भरावा लागतो. तसेच युनियन बँक ऑफ इंडियाच्या कर्ज रकमेच्या 0.5% प्रक्रिया शुल्क द्यावे लागते.

2- बँक ऑफ इंडिया- बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पाच वर्षांकरिता एक लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज दिले जाते. बँकेच्या माध्यमातून कर्जावर 10.35 ते 14.85% पर्यंत व्याजदर आकारला जातो.

यामध्ये तुम्हाला एक लाख रुपयांसाठी 2142 ते 2371 रुपये पर्यंतचा ईएमआय भरणे गरजेचे असते व प्रोसेसिंग फी दोन टक्के आहे.

3- आयसीआयसीआय बँक- आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना पाच वर्षांच्या कालावधी करीता एक लाख रुपये पर्यंतचे पर्सनल लोन देते. यावर बँकेच्या माध्यमातून 10.75 ते 19 टक्क्यांपर्यंत व्याजदर असू शकतो.

म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 2162 ते 2594 रुपयेपर्यंत ईएमआय भरावा लागतो. तसेच अडीच टक्के पर्यंत प्रक्रिया शुल्क आकारले जाते.

4- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँक ग्राहकांना पाच वर्षाच्या कालावधी करीता एक लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते. या कर्जावर 10.35 ते 21 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जातो. जर एक लाखावरचा ईएमआय पाहिला तर तो साधारणपणे 2142 ते 2705 रुपये इतका द्यावा लागतो.

5- ॲक्सिस बँक या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला पाच वर्षांसाठी एक लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज मिळू शकते व व्याजदर 10.49% ते 13.65% पर्यंत आहे. या एक लाखासाठी तुम्हाला 2149 ते 2309 रुपये इतका ईएमआय भरावा लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe