7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. ही अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता संदर्भात. खरेतर महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जात असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे. विशेष म्हणजे हा महागाई भत्ता आणखी चार टक्क्यांनी वाढणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता मध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणे हे जवळपास सुनिश्चित झाले आहे. यानुसार आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50% एवढा होणार आहे.
यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची आशा आहे. मात्र याबाबत केंद्र शासनाने अजूनही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. मार्च 2024 मध्ये याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे. म्हणजेच त्यावेळी महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.
खरेतर यंदा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. लोकसभा निवडणुकाची आचारसंहिता ही मार्चमध्ये लागू होणार आहे. तत्पूर्वीच केंद्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाईल असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे.
होळी सणाच्या आसपास याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले जात आहे. निश्चितच जर मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.
घर भाडे भत्ता ही वाढणार
यावेळी फक्त महागाई भत्ताच वाढणार आहे असं नाही तर महागाई भत्ता 50% क्रॉस झाल्यानंतर घर भाडे भत्ता देखील वाढवला जाणार आहे. घर भाडे भत्ता हा तीन टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार असे वृत्त समोर आले आहे.
सध्या X श्रेणीअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 27%, Y श्रेणी अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 18% आणि Z श्रेणी अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए लागू आहे. आता मात्र यामध्ये आणखी तीन टक्क्यांपर्यंतची वाढ होण्याची आशा आहे.