‘ही’ कंपनी 15 हजार फ्रेशर्संना देणार नोकरी

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली :- कोरोनाने सर्वच क्षेत्रातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करत आहेत तसेच पगारातही कपात करत आहेत.

मात्र अशा परिस्थितीतही एचसीएल टॅक्नॉलॉजीने 15000 फेशर्सना नोकरी देणार असल्याचे सांगितले आहे.

सॉफ्टवेअर सेवा उपलब्ध करणारी देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचसीएल टॅक्नॉलॉजीने यापूर्वी 15000 फ्रेशर्संना नोकरी देण्याची ऑफर दिली आहे.

एका दैनिकाच्या वृत्तानुसार कोरोना संकटामुळे कंपनीचा एकही प्रकल्प रद्द करण्यात आलेला नाही. मात्र नवीन प्रकल्पांचे काम धीम्या गतीने सुरू आहेत.

कोरोनाच्या संकटात एचसीएलने आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात घट केली नाही. याशिवाय गेल्या वर्षीचा बोनसही देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे कंपनीवर परिणाम झाला असला तरी ते कंपनीच्या एकही कर्मचाऱ्याला कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment